
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव – कोरोना महामारीच्या काळात अनेक कुटुंबांची वाताहत झाली. घरातील कर्ता पुरुष,घर सांभाळणारी गृहलक्ष्मी काळाने हिरावून नेली.ते दिवस आठवले तर अंगावर शहारे येतात.घरातीलच माणसांनी साथ सोडली होती.खडतर आयुष्य सावरत अनेक विधवा महिलांनी आपल्या संसाराची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न केले.त्यांना साथ दिली ती,”कोरोना एकल महिला समीतीने” पती निधनानंतर काही महिलांना कुटुंबातून साथ मिळाली तर काहिंना संघर्ष करावा लागतो आहे.
म्हणून कोरोना एकल महिला समितीच्या सौ.संगिताताई मालकर आणि सहकार्यांनी महिलांना आर्थिक उत्पन्न सुरू करण्यासाठी शेळी पालन, शिलाई मशीन,राहण्यासाठी घरकुल आदि प्रकारे मदतीचा हात दिला.या कामासाठी शासकीय अधिकारी, समाजातील दानशूर सेवाभावी संस्था संघटना व्यक्तींनी यथाशक्ती मदत केली.याचाच परिणाम अनेक कोरोना एकल महिलांची मुलं शिक्षण घेत आहेत आणि संसाराची विस्कटलेली घडी सावरण्यासाठी मदत करत आहेत.
संकटांवर मात करून संघर्षमय जीवन जगण्यासाठी धडपडणाऱ्या नवदुर्गांचा सन्मान सन्मानपत्र देऊन पंचायत समितीच्या सभागृहात संपन्न झाला
या प्रसंगी गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी, वाघेरे,कृषीअधिकारी साबळे,सौ.शोभाताई ठोळे,सौ.उमाताई वहाडणे,सौ.गिरमे,सौ.गिता रासकर, हेमचंद्र भवर आणि कोरोना एकल महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
सौ.संगिताताई मालकर यांनी स्वागत प्रास्ताविक केले तर गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांनी योजनांची माहिती दिली,छाया गिरमे यांनी आभार प्रदर्शन केले.
नवरात्र उत्सवानिमित्त झालेल्या सत्कारामुळे कोरोना एकल महिलांमध्ये चैतन्य निर्माण झाले.