Homeकोपरगावश्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत पोलीस स्मृतिदिना निमित्त चित्रकला स्पर्धा

श्रीमान गोकुळचंदजी विदयालयांत पोलीस स्मृतिदिना निमित्त चित्रकला स्पर्धा

मुख्य संपादक – राजेंद्र तासकर

कोपरगाव : भारतातील विविध पोलीस दलांमध्ये कर्तव्य बजावत असतांना देशासाठी हौतात्म पत्करलेल्या सर्व पोलीस बांधव प्राणाची आहुती देत शहीद होतात.त्यांना श्रध्दांजली देण्यासाठी व पोलीसा प्रती आदर म्हणुन २१आॕक्टोंबर हा दिवस पोलिस स्मृति दिन म्हणुन साजरा केला जातो.या दिनाच्या निमित्तानं आज विदयालयांत चित्रकला स्पर्धचे आयोजन करण्यात आले होते.

या निमित्तानं मार्गदर्शन करतांना कोपरगांव शहर पोलिस निरीक्षक मा. श्री.प्रदीप देशमुख यांनी पोलीसांची समाजा प्रति भुमिका समजावुन सांगितली.कर्तव्ये बजावतांना काही पोलीस शहीद होतात त्यांच्या प्रति आठवण म्हणून आजचा हा दिवस महत्वाचा आहे असे त्यांनी स्पष्ट केले. शहीद पोलीसांचा सन्मान करणे हे देखिल आपले कर्तव्य आहे असे ते म्हणाले.या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक मकरंद कोऱ्हाळकर यांनी केले.तर आभारउपमुख्याध्यापक रमेश गायकवाड यांनी मानले. चित्रकला स्पर्धेचे संयोजन श्री.अनिल अमृतकर व अतुल कोताडे सर यांनी केले.विद्यालयांच्या पर्यवेक्षिक श्रीमती उमा रायते,मा.खारतोडे सर्व शिक्षक व विदयार्थी या कार्यक्रमाला उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!