
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
श्री कालभैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचे,एस.डी.जाधव इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांनी दि.२९ ऑक्टोबर २०२३ रोजी झालेल्या जिल्हास्तरीय बॉक्सिंग मॅचेसमध्ये घवघवीत यश संपादित केले.
यामध्ये १४ वर्षे वयोगटातील कु.समर्थ अमोल गीते याने तृतीय क्रमांक मिळवत नाशिक जिल्ह्यातनावलौकिक मिळवला तर १७ वर्षे वयोगटातील कु. ओम गणेश सोमवंशी याने ७५ किलो वजन गटात जिल्ह्यात पहिला क्रमांक मिळविला आहे त्याची नंदुरबार येथे होणाऱ्या विभागीय स्तरावर निवड करण्यात आली आहे.तसेच ६६किलो वजन गटात कु.राम गणेश बोरणार या विद्यार्थ्यांनी तिसरा क्रमांक मिळविला आहे.या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणारे शाळेचे क्रीडा शिक्षक श्री.निवृत्ती मुरडणर सर यांची नाशिक जिल्हा क्रीडा बॉक्सिंग असोसिएशनच्या सदस्य पदी निवड करण्यात आली.या सर्व विजयी विद्यार्थ्यांसह शिक्षकांवर नाशिक जिल्हासह पंचक्रोशितून कौतुक व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.



घवघवीत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आला.या विद्यार्थ्यांचा सत्कार करताना श्री काल भैरवनाथ शिक्षण प्रसारक संस्थेचे संस्थापक आदरणीय श्री संभाजी जाधव यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्व सांगून विविध खेळाडूंच्या जीवनातील प्रसंग सांगितले.तसेच शाळेचे प्राचार्य श्री निळकंठ सर यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
याप्रसंगी संस्थेची संस्थापक श्री संभाजी जाधव सर,सौ.शुभांगी जाधव, प्राचार्य श्री.अतुल निळकंठ,क्रीडा शिक्षक श्री.निवृत्ती मुरडणर,वर्गशिक्षक श्री कैलास वर्पे,श्री अनिल चतुर,सौ.निलोफर शेख,सौ.रूपाली निरगुडे,सौ. प्रियंका पगार,श्री.संदीप शिंदे,श्री.सुरेश पारधी,सौ.वर्षा उगले,श्री.सचिन जाधव,श्री.मुकुंद शिरसाट,श्री.प्रीतम जाधव,सौ.भाग्यश्री जाधव,सौ.मनीषा वाणी,सौ.सुमन दत्ता,सौ.संगीता अस्वले,कु.प्रतीक्षा जाधव.आदी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री.अनिल चतुर सर यांनी केले.