Homeकोपरगावकोपरगाव तहसिल कार्यालयासमोर…. यांचा विविध मागण्यासाठी अमरण उपोषणाचा इशारा

कोपरगाव तहसिल कार्यालयासमोर…. यांचा विविध मागण्यासाठी अमरण उपोषणाचा इशारा

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : महागाईच्या काळात महाराष्ट्रातील दिव्यांगांना संजय गांधी निराधार योजनेचे दिले जाणारे अनुदान तुटपुंज्य असून त्यामध्ये वाढ करण्यात यावी म्हणून वारंवार पाठपुरावा करून सुद्धा शासन त्यावर गांभिर्याने विचार करत नसल्याने अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष पत्रकार मा.अनिसभाई शेख यांच्या मार्गदर्शनाखाली संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब लांडे यांनी दिव्यांगांना दिले जाणारे संजय गांधी निराधार अनुदान पाच हजार रुपये देण्यात यावे या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांचे निवेदन नायब तहसिलदार मा.सातपुते मॅडम यांना १९ऑक्टोबर२०२३ रोजी देऊन अमरण उपोषणाचा दिला इशारा.

दिलेल्या निवेदनात श्री.बाळासाहेब लांडे पुढे म्हणाले कि,महाराष्ट्र वगळता अन्य राज्यांमध्ये दिव्यांगाना चार ते पाच हजार रुपये मानधन दिले जाते तर महाराष्ट्रातील दिव्यांगांवर अन्याय का ?असा सवाल उपस्थित करत,पुढे ते म्हणाले आहे कि,जोपर्यंत महाराष्ट्रातील दिव्यांगांना पाच हजार रुपये मानधन मंजूर करून जी आर (परिपत्रक) जारी होत नाही तोपर्यंत मी अमरण उपोषण चालू ठेवणार,यामध्ये माझा अंत्य जरी झाला तरी चालेल परंतु दिव्यांगांना पाच हजार रुपये मानधन मंजूर केल्याशिवाय मी उपोषण स्थगित करणार नाही,असा पवित्रा उचलत बाळासाहेब लांडे यांनी दि. २नोहेंबर २०२३ रोजी अमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे.यावेळी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.

त्याचबरोबर दिव्यांगांना घरकुल बांधण्यासाठी स्व-मालकीची जागा उपलब्ध नसल्यास घरकुलापासून वंचित रहावे लागते तर त्यांना स्व – मालकीची जागा खरेदीसाठी कमीत कमी तीन लाख रुपये अनुदान देण्यात यावे,संजय गांधी योजनेचे अनुदान दिव्यांगांच्या बँक खात्यावर दरमहा एक तारखेलाच जमा करण्यात यावे, दिव्यांगांची दरवर्षी दिवाळी गोड व्हावी म्हणून संजय गांधी योजनेप्रमाणे दिव्यांगांना दहा हजार रूपये (१०,०००) बोनसभत्ता देण्यात यावा, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये नामनिर्देशनपत्र दाखल न करता दिव्यांगांना प्रतिनिधित्व देण्यासाठी संसदेत कायदा पारित करण्यात यावा यासह आदि मागण्या शासनाकडे केल्या असून शासनाने याकडे जाणिवपूर्वक लक्ष देऊन दिव्यांगांना न्याय द्यावा,अन्यथा मी अपंग जनता दल सामाजिक संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब लांडे दि.२ नोव्हेंबर २०२३ रोजी अमरण उपोषण करणार असून याची सर्वस्वी जबाबदारी शासनाची राहिल याची नोंद घ्यावी असेही त्यांनी आपल्या दिलेल्या निवेदन म्हटले आहे.

दिव्यांगांच्या न्याय हक्कासाठी शासनास जाग आणण्यासाठी श्री.लांडे यांनी २ नोव्हेंबर २०२३ रोजी अमरण उपोषण पुकारले असून त्यांच्या या जनहितार्थ कार्यात सर्व दिव्यांग बांधवांसह विविध क्षेत्रातील जनतेने पाठिंबा देऊन सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!