Homeकोपरगावशंकरबाग शाळेत ''सायकल बँक उपक्रम''सुरू - संजय हासे, मुख्याध्यापक

शंकरबाग शाळेत ”सायकल बँक उपक्रम”सुरू – संजय हासे, मुख्याध्यापक

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : अहमदनगर जिल्हा परिषदेच्या कोपरगाव तालुक्यातील येसगाव केंद्रातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शंकरबाग मधील लांबून येणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेत वेळेत येता यावे तसेच अडी अडचणीच्या काळात घरी लवकर पोहचता यावे यासाठी पुणे येथील लायन्स,लायनेस क्लब सहकार नगर येथील लायनेस सौ.सरिता चंद्रशेखर सोनावळे यांच्या माध्यमातून ५६ हजार रुपये किमतीच्या ७ सायकली मोफत देऊन शंकरबाग शाळेत ”सायकल बँक उपक्रम ”सुरू करण्यात आला असल्याची माहिती शाळेचे मुख्याध्यापक संजय हासे यांनी दिली.

कोपरगाव पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांच्या मार्गदर्शनाखाली व ब्राम्हणगाव फळबाग सहकारी शेतकी संघ सोसायटीचे चेअरमन,कोपरगाव पिपल्स बँकेचे संचालक,शंकरबाग शाळेचे माजी विद्यार्थी हेमंत बोरावके यांच्या हस्ते तन्वी गायकवाड,पूर्वा पिंगळे,दुर्गेश्वरी वाणी,शारदा खुरसने,वैष्णवी गांगुर्डे,नीता डांभला,इरम शेख यांना सायकलींचे वाटप करण्यात आले आहे.तसेच या उपक्रमांतर्गत देण्यात आलेल्या सायकलींची काळजी विद्यार्थ्यां सोबत पालकांनी ही कुटुंबासारखी घ्यावी.असे आवाहन पालकांना करण्यात आले.

तालुक्यातील सामाजिक संस्था,संघटनांनी अशा उपक्रमांमध्ये सहभागी होऊन ग्रामीण भागातील शाळांमधील मुला-मुलींना सहकार्य करण्याचे आवाहन गटशिक्षणाधिकारी शबाना शेख यांनी केले.

उपक्रमाविषयी अधिक माहिती देताना हासे म्हणाले की,या उपक्रमांतर्गत देण्यात येणाऱ्या सायकलींचा मालकी हक्क सर्वस्वी शाळेचा राहील, दिवाळी,उन्हाळा सुट्टी या कालावधीत या सायकली शाळेत जमा कराव्यात. सायकलींची छोटी-मोठी दुरुस्ती करणे ही पालकांची जबाबदारी असेल.या शाळेत शिक्षण घेत असतानाच या सायकलींचा उपयोग करता येईल, त्यानंतर सुस्थितीत सायकली पुन्हा शाळेत जमा करणे.सायकलींचा उपयोग फक्त शाळेत येण्या – जाण्यासाठी करावा.सायकल वापरत असताना काही दुखापत,अपघात झाल्यास सर्वस्वी जबाबदारी पालकांची असेल.या निकषांच्या आधारे सदर मुलींना सायकली देण्यात आल्या.

या वेळी शाळा व्यवस्थापन समितीचे तज्ञ संचालक पोपट साळवे,शंकर गांगुर्डे,नितीन पिंगळे,अशोक वाहूळ, श्रावण खुरसणे,श्रीमती आशा वाणी, धनराज आहिरे आदींसह विद्यार्थ्यांचे पालक,माता मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार शिक्षक संतोष जाधव यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!