
संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगाव,
अन्याया विरुद्ध पेटून उठायचे असेल व समाजात जागृती व परिवर्तन घडवायचे असेल तर क्रांती नायक फकिरचा विचार पेरल्या शिवाय परिवर्तन शक्य नाही असे प्रतिपादन लोक स्वराज्य आंदोलनाचे प्रदेश अध्यक्ष अँड.नितीन पोळ यांनी व्यक्त केले.
कोपरगाव येथे लोक स्वराज्य आंदोलन व लहुजी टायगर सेनेच्या वतीने क्रांती नायक फकिरा यांची जयंती साजरी करण्यात आली.
या वेळी कोपरगाव येथील सामाजिक कार्यकर्ते सुनील फंड यांच्या हस्ते फकिरा यांच्या प्रतिमेचे पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी बोलताना पोळ पुढे म्हणाले की,फकिराने उभा केलेला संघर्ष सर्व सामान्य जनतेच्या मनात विश्वास निर्माण करून स्वाभिमान निर्माण करणारा आहे बलाढय इंग्रजी सत्ते विरुद्ध बंड निर्माण करण्याची ताकद फकिरच्या विचारात होती आणि त्याच्या विचाराने प्रेरित होऊन अनेकांनी या स्वाभिमानी लढ्यात उडी घेतली,आज देखील समाजात परिवर्तन घडवायचे असेल तर समाज फकिरचा विचार रुजवणे आवश्यक आहे.
यावेळी शरद त्रिभुवन,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र बागुल यांनी आपले मनोगत व्यक्त केले,
यावेळी कोपरगाव येथील शिक्षक बलभीम उल्हारे यांची बिसेफ संघटनेच्या जिल्हा कार्यकारणी वर निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला.
यावेळी सुनील फंड राजेंद्र बागुल,शरद त्रिभुवन,देवराम पगारे विनोद वाकळे जयवंत मरसाळे आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय तुपसुंदर यांनी केले तर आभार दिपक आरणे यांनी व्यक्त केले.