
पद्मविभुषण डॉ.शरदचंद्रजी पवार पतसंस्था मयताच्या वारसास ३ लाखाचा धनादेश देतांना आ.आशुतोष काळे समवेत चेअरमन देवेंद्र रोहमारे व संचालक मंडळ
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : तालुक्यातील गौतमनगर येथील पद्मविभुषण डॉ.शरदचंद्रजी पवार साहेब नागरी सहकारी पतसंस्थेचे कर्जदार स्व.बाबुराव भास्कर बडवर यांचे अपघाती निधन झाले होते.त्यांना विमा कंपनीकडून मिळालेला ०३ लाखाच्या नुकसान भरपाईच्या मदतीचा धनादेश नुकताच कारखान्याचे चेअरमन आ.आशुतोष काळे यांच्या हस्ते त्यांच्या वारस पत्नी श्रीमती सुनिता बाबुराव बडवर यांना देण्यात आला आहे.
संस्थेचे मार्गदर्शक मा.आ.अशोकराव काळे व आमदार आशुतोष काळे यांच्या सूचनेनुसार पद्मविभुषण डॉ.शरदचंद्रजी पवार नागरी सहकारी पतसंस्थेने संस्थेच्या सर्व कर्जदारांचा ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडून विमा उतरविला आहे.संस्थेचे मयत कर्जदार यशवंत बापू हाळनोर यांचा देखील यामध्ये समावेश असल्याने संस्थेने त्यांचा रु.०३लाख रुपयांचा विमा उतरविलेला होता.कर्जदार स्व.बाबुराव भास्कर बडवर यांचे अपघाती निधना नंतर संस्थेकडून ओरीएंटल इंशुरन्स कंपनीकडे विमा पॉलिसीची भरपाई मिळावी यासाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांची पूर्तता केली होती.
दिओरीएंटल इंशुरन्स कंपनीने त्या सर्व कागदपत्रांची पडताळणी करून मयत सभासद स्व.बाबुराव भास्कर बडवर यांच्या वारसांना पॉलिसी पोटी ३ लाख रुपयांची जनता व्यक्तिगत दुर्घटनाविमा रक्कम मंजूर केली.त्या रक्कमेचा धनादेश नुकताच मयत स्व.बाबुराव भास्कर बडवर यांच्या वारस त्यांच्या पत्नी श्रीमती सुनिता बाबुराव बडवर यांना आमदार आशुतोष काळे यांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी संस्थेचे चेअरमन देवेंद्र रोहमारे,व्हा. चेअरमन रावसाहेब चौधरी,संचालक,अनिल महाले,व्यंकटेश बारहाते,सौ. मेघा कडवे,सौ.परवीन सय्यद,वीरेंद्र शिंदे,ज्ञानेश्वर हाळनोर,दिओरीएंटल इंशुरन्स कंपनीचे विमा प्रतिनिधी कैलास पांडे,मॅनेजर मंगेश देशमुख आदी मान्यवर उपस्थित होते