Homeकोपरगावगौतम पब्लिक स्कुलचा माजी विद्यार्थी भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी

गौतम पब्लिक स्कुलचा माजी विद्यार्थी भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव :-कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम पब्लिक स्कुलचा माजी विद्यार्थी महेश शरदराव वाबळे यांची भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी नियुक्ती झाल्याबद्दल त्यांचा गौतम पब्लिक स्कुलच्या वतीने नुकताच सत्कार करण्यात आला आहे.

शहरात इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना देखील इंग्रजी माध्यमातून शिक्षण मिळावे यासाठी कर्मवीर शंकररावजी काळे यांनी कोळपेवाडी येथे गौतम पब्लिक सुरु केले.या गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थी विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत असून सुरेगाव येथील माजी विद्यार्थी महेश शरदराव वाबळे यांनी देखील अशीच कामगिरी बजावली असून त्याची भारतीय नौदलात सब लेफ्टनंटपदी नियुक्ती झाली आहे.गौतम पब्लिक स्कूलच्या विद्यार्थ्यांची ज्या ज्या वेळी अशा निवडी होतात त्या त्यावेळी गौतम पब्लिक स्कूलला या विद्यार्थ्यांचा अभिमान वाटतो.गौतम पब्लिक स्कूलच्या अनेक विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रात विद्यार्थ्यांनी अशी कामगिरी केली असून सर्वच विद्यार्थ्यांचे संस्थेच्या सचिव सौ.चैतालीताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली यथोचित सत्कार केले जातात.त्याप्रमाणे कर्मवीर शंकरराव काळे एज्युकेशन सोसायटीच्या गौतम परिवाराकडून महेश शरदराव वाबळे यांचा सत्कार करण्यात आला.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचे शिक्षण मिळावे यासाठी कर्मवीर शंकररावजी काळे साहेबांनी सुरु केलेल्या गौतम पब्लिक स्कुलचे विद्यार्थी विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवत असून महेश सारखे विद्यार्थी स्वर्गीय काळे साहेबांनी पाहिलेले स्वप्न सत्यात उतरवत आहेत याचा अभिमान वाटतो अशी भावना यावेळी प्राचार्य श्री नुर शेख सर यांनी यावेळी व्यक्त केली.

महेश वाबळे यांनी मिळविलेल्या यशाबद्दल संस्थेचे चेअरमन माजी आमदार अशोकराव काळे,विश्वस्त आ.आशुतोष काळे व सचिव सौ. चैतालीताई काळे यांनी देखील अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.या सत्कार सोहळ्याप्रसंगी प्राचार्य नुर शेख यांच्यासह सर्व शिक्षक,विद्यार्थी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!