HomeUncategorized"विकसित भारत संकल्प यात्रा"रथाचे कुंभारी नगरीत मिरवणूकीसह स्वागत

“विकसित भारत संकल्प यात्रा”रथाचे कुंभारी नगरीत मिरवणूकीसह स्वागत

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव :- देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरकारच्या वतीने अनेक जनकल्याणार्थ योजना सुरु करून सामान्यतः सामान्य घटकास बळ देण्यात आले असून विकासापासून वंचित असणाऱ्या लोकांपर्यंत या शासकीय योजना पोहचाव्यात यासाठी “विकसित भारत संकल्प यात्रा” रथ खेडयापाड्यापर्यंत पोहचविण्यात येऊन विविध उपक्रमांची माहिती डिजिटल स्क्रिनवर दर्शविण्यात येत आहे.या विकसित भारत संकल्प यात्रा रथाचे (दि.२७डिसेंबर२३) रोजी तालुक्यातील कुंभारी नगरीत ग्रामपंचायतच्या वतीने स्वागत करून जिल्हा परिषद प्राथमिक

शाळेच्या विद्यार्थ्यांनी शाळेचे शिक्षक झाडे सरांच्या मार्गदर्शनाखाली सवाद्यासह लेझिम खेळाचे प्रात्यक्षिक दाखवत संपूर्ण गावातून मिरवणूक काढण्यात येऊन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात डिजिटल चित्रफितीद्वारे प्रधानमंत्री आवास योजना,उज्वला गॅस योजना,किसान सन्मान निधी योजना,आयुष्यामान भारत योजना,मुद्रा लोन योजना, विश्वकर्मा योजना,महिलां बचत गटांसाठी उमेद स्वयंसहाय्यता योजना अशा अनेक शासकीय योजनांची माहीती देण्यात आली व शासनाच्या वतीने सर्वांना नववर्षाचे शासकीय माहिती असलेले कॅलेंडर देण्यात आले. त्याचबरोबर शासकीय रथाचे सारथीं चा ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करण्यात आला.

यावेळी ग्रामपंचायतच्या महिला सरपंच सौ.देवयानी घुले,उपसरपंच दिलिप ठाणगे,सदस्य ललित निळकंठ,रामराव चंदनशिव,संजय ठाणगे,ज्योती अहिरे,रंजना गायकवाड,ग्रामसेवक कहार डी.आर,कृषी सहाय्यक एस.पी. खंडागळे,जि.प.प्रा शाळेचे शिक्षिका,शिक्षक झाडे सर,ग्रा.प.क्लार्क निता कदम,ऑपरेटर मोनाली पैठणे,आशा सेविका जयश्री कदम,मनिषा पवार, संगिता शिंदे,आरोग्य सेविका जाधव एस.एस,मदतनिस ताराबाई चिने,बचत गट सीआरपी वृषाली कदम,शिपाई रविंद्र व्हरे,पंपमन शंकर चंदनशिव, शिवाजी भारती,सुकदेव मोहरे,अलकाताई लुटे,नाना शेजवळ,सुनंदाताई भारती,संगिताताई भारती, यांसह आदि महिला,ग्रामस्थ,शाळेचे विद्यार्थी- विद्यार्थीनी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बापू चव्हाण यांनी केले तर शेवटी उपस्थितांचे आभार प्रदर्शन ग्रामसेवक कहार डी.आर यांनी मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!