
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगांव : तालुक्यातील श्रीक्षेत्र मायगांवदेवी येथील गुरूदेव आश्रमात ब्रम्हलिन १००८ परमहंस परिव्राजकाचार्य स्वामी मुकूंदानंद सरस्वती महाराज यांचा ३४ वा पुण्यतिथी सोहळा १८ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजता संपन्न होत आहे.
सदर दिवशी सकाळी ७ ते ८ समाधी स्नान,८ ते ९ पादुकापुजन व सकाळी ९ ते ११ या वेळेत अखिल भारतीय संत समिती महाराष्ट्र राज्याचे महामंत्री ऋषीकेश येथील ह.भ.प श्री.दिनानाथ महाराज यांचे किर्तन होईल.
या कार्यक्रमासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे मठाधिपती प.पू. रमेशगिरी महाराज,राघवेश्वर देवस्थान कुंभारीचे प.पू.राघवेश्वरानंद उंडे महाराज,मायगांवदेवी येथील प.पू.विकासगिरी महाराज,पेडगांव पेडसी येथील प.पू.गोविंदपुरीजी महाराज यांच्यासह संजीवनी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पुण्यतिथी सोहळयात पंचकोशीतील मायगांवदेवी,धामोरी, सांगवीभुसार,वेळापूर,मंजुर,कारवाडी, मोर्विस,मढी,चासनळी,सत्यगांव परिसरातील भजनी मंडळी व भाविक मोठया संख्येने उपस्थित राहणार आहेत.किर्तनाचा कार्यकम आटोपल्यावर महाप्रसादाचे वाटप करण्यांत येणार आहे.
तरी भाविकांनी या सर्व धार्मीक कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन मायगांवदेवी ग्रामस्थ व गुरूदेव आश्रम विश्वस्तांनी केले आहे.