Homeकोपरगावसंवत्सर येथे नवनिर्वाचित संचालक पंडित भारुड यांचा सत्कार

संवत्सर येथे नवनिर्वाचित संचालक पंडित भारुड यांचा सत्कार

मुख्य संपादक / राजेंद्र तासकर

कोपरगाव: तालुक्यातील कोपरगाव औद्योगिक सहकारी वसाहत (इस्टेट) सोसायटी लिमिटेडच्या संचालक पदी संवत्सर येथील पंडित जमनराव भारुड यांची निवड झाल्याबद्दल संवत्सर ग्रामस्थांच्या वतीने शाल,श्रीफळ, पुष्पगुच्छ व फेटा बांधून त्यांचा यशोचित सत्कार करण्यात आला.

नवनिर्वाचित पंडित भारुड सर यांचा सत्कार करून त्यांना भावी कार्यास व वाटचालीस सर्वांनी शुभेच्छा दिल्या त्यावेळी अनेकांनी आपले मनोगत व्यक्त केले.

सदर प्रसंगी संवत्सर ग्रामपंचायतचे सदस्य महेश परजणे,श्री संत सावता माळी युवक संघ महाराष्ट्र राज्याचे मुकुंद मामा काळे,कोपरगाव तालुका मानवाधिकार कार्याध्यक्ष मोहनराव निकम,प्रगतशील शेतकरी राजुआबा बोरनारे,जयभीम पाणी वाटप सहकारी संस्थेचे संदिप मैंद,दिनेश नाना बोरनारे आदि मान्यवर या वेळी उपस्थित होते.

सत्कारमुर्ती श्री.भारूड सत्काराला उत्तर देतांना म्हणाले कि,सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष व सहकारातील तरुण तडफदार नेते विवेकभैय्या बिपिनदादा कोल्हे व संपूर्ण कोल्हे परिवार यांनी औद्योगिक सहकारी वसाहतमध्ये मला दिलेली कामाची संधी मी जबाबदारीने पुर्ण करुन मिळालेल्या संधीचे सोनं करीन असे शेवटी आभार मानतांना सांगितले व ग्रामस्थांनी सत्कार केल्याबद्दल समस्त भारुड परिवाराने सर्वांचे आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!