
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – मनुष्य प्राणी हा कर्माने नव्हे,तर शिक्षणाने मोठा असतो. शिक्षण हे वाघीणीचे दुध आहे हे कोपरगाव तालुक्यातील टाकळी येथील तांबोळी वस्ती येथे राहणाऱ्या सादिया पापाभाई तांबोळी हिने आपल्या शिक्षणाच्या जोरावर मिळविलेल्या यशातून सिद्ध केले आहे.हिची महाराष्ट्र वन विभागात कोल्हापूर वनवृत्तामध्ये वनरक्षक पदी निवड झाली असून तिने पहिल्याच प्रयत्नामध्ये हे यश संपादन केले आहे.
सादिया पापाभाई तांबोळी हीने कठोर परिश्रम करत जिद्द आणि चिकाटीने गरीब परिस्थितीशी दोन हात करत हे यश मिळविले.आई व वडील पापाभाई तांबोळी यांनी लोकांच्या शेतात मोलमजुरी करत काबाडकष्टातून आपल्या मुलांना शिकविले आहे.
तिच्या या निवडीबद्दल तिचा टाकळी ग्रामस्थांच्या वतीने सत्कार करुन तिला पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या तसेच टाकळी व कोपरगाव पंचक्रोशीतून संपूर्ण परिवारावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
याप्रसंगी सरपंच संदीपभाऊ देवकर,मा.सभापती सुनीलभाऊ देवकर, उपसरपंच संजयभाऊ देवकर,सदस्य शशिकांत देवकर,सोसायटीचे चेअरमन रामदास पाटील देवकर व कोसाका चे माजी.संचालकभागवतराव देवकर,पोलीस पाटील राजेंद्र देवकर,सोपानराव देवकर,छगनराव देवकर, गणेश देवकर,अमोल देवकर,दत्तात्रय भोसले,सुलेमान तांबोळी,रसूलभाई शेख,शरीफ तांबोळी,जाकीर तांबोळी, शकिल तांबोळी,समिर तांबोळी, सुनील पाईक,चंद्रभान देवकर,नवनाथ देवकर,अमोल भुजबळ आणि बंधु फयाज तांबोळी यांसह समस्त टाकळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.