Homeकोपरगावधनादेश अनादरीत प्रकरणात एकास सहा महीने शिक्षा व दंड

धनादेश अनादरीत प्रकरणात एकास सहा महीने शिक्षा व दंड

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – कोपरगाव येथील न्यायालयाने दि. १/०३/२०२४ रोजी फिर्यादी बँक जी.एस.महानगर को- ऑप.लि.शाखा-कोपरगाव यांचे फिर्यादीवरून चौकशी पुर्ण होवुन आरोपी प्रशांत शिवाजी शिर्के यास दोषी धरून सहा महीने कारावास व तीन लाख काम्पेसेशन फिर्यादीस दयावी. तसे नाही केल्यास आणखी तीन महीणे कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली.

आरोपी शिर्के याने फिर्यादी बँकेकडुन कर्ज घेवुन त्याच्या परतफेडीसाठी बँकेस रूपये तीन लाखाचा चेक दिला होता.सदर चेक हा न वटल्यामुळे बँकेने आरोपीविरूध्द फौजदारी केस दाखल केली.त्या केस प्रकरणी फिर्यादीतर्फे योगेश रघुनाथ पादीर व राहुल देवराम झावरे यांची साक्ष महत्वाची ठरलेली आहे.सदर निर्णयामुळे बँकेचे पैसे घेवुन परत न करणा-यां विरूध्द व खात्यात पैसे नसतांना चेक देणा-यांविरूध्द मोठी चपराक बसणार आहे.सदर आदेश दिल्याने कर्जदार व जामीनदारात भितीचे वातावरण पसरलेले आहे.

सदर केस अॅड.विदयासागर शिंदे असोसिएट्स यांनी फिर्यादी बँकेचे वतीने चालविले.अॅड. राजश्री शिंदे यांनी जोरदार युक्तीवाद केला.सदर युक्तीवाद ग्राहय धरून न्यायालयाने आरोपीस वरीलप्रमाणे शिक्षा सुनावली. त्यांना अॅड. सुयोग बाळासाहेब जगताप व अॅड.सचिन उगले यांनी सहाय्य केले व अॅड. विदयासागर शिंदे यांनी मार्गदर्शन केले. या निकालाने कर्जदाराने चेक देवुन कर्ज बुडवण्याच्या वृत्तीला नक्कीच आळा बसणार आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!