
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : -संजीवनी इंग्लिश मिडियम स्कूलने या वर्षी सिनेमेनिया ही थिम ठेऊन के.जी.ते इयत्ता 9 वी पर्यंत च्या सर्वच विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला.कार्यक्रमाची सुरुवात विद्येची देवता माता सरस्वती व आदरणिय दिवंगत माजी मंत्री शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली.

शाळेच्या 43 व्या स्नेहसंमेलनासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस निरिक्षक कोपरगाव शहर मा.प्रदीप देशमुख साहेब,मा.संदीप कोळी साहेब पोलीस निरीक्षक कोपरगांव ग्रामीण तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलचे अध्यक्ष युवा नेते मा.विवेकभैय्या कोल्हे साहेब हे होते,तसेच संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे, परागजी संधान,सौ.संधान,संजयराव होन,सेक्रेटरी भिंगारे साहेब,संस्था मुख्याधिकारी प्रदीप गुरव साहेब,प्राचार्य मोहसिन शेख सर,अकॅडमी हेड हरिभाऊ नळे आदि मान्यवरांची यावेळी उपस्थिती लाभली.

प्रत्येक उपक्रम,स्पर्धा,इत्यादीमधील सहभागाने संघ भावना,व्यवस्थापन कौशल्य,एकमेकांना जाणुन घेणे,हार जीत पचवीने असे कळत-नकळत विविध व्यक्तीमत्वाच्या पैलूंची जडण घडण होत असते.म्हणूून प्रत्येकाने प्रत्येक ठिकाणी यश अपयशाची तमा न बाळगता सहभाग घेऊन जीवन यशस्वी करावे असे प्रतिपादन कोपरगांव शहर पोलिस स्टेशनचे मुख्य पोलीस निरीक्षक मान.प्रदीप देशमुख साहेब यांनी संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी व्यक्त केले.

यावेळी शाळेच्या मॅनेजिंग ट्रस्टी सौ.रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे बोलतांना म्हणाल्या की,शाळेतील शैक्षणिक,क्रीडा,कला,सांस्कृतिक मध्ये तालुका,जिल्हा,विभाग,राज्य स्पर्धा परीक्षेत सुयश प्राप्त केले आहे.त्याबद्दल संबंधित विद्यार्थी,पालक यांच्या सोबत नव्याने रुजू झालेले प्रिन्सिपॉल मोहसिन शेख सर,शिक्षक वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांचे भरभरून कौतुक केले.यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे देशमुख साहेब यांनी सुध्दा विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे ही बाब विषेश असल्याचे सांगितले,संदिप कोळी साहेब यांनी सुध्दा विद्यार्थ्यांचे,सर्व शाळा मॅनेजमेंट व शिक्षकांचे मनभरून कौतुक केले.विविध नृत्य सादर करून उपस्थितांची वाह !वा विद्यार्थ्यांनी मिळवली.

यावेळी अध्यक्षस्थानावरून बोलतांना मान.विवेकभैय्या कोल्हे म्हणाले की, मी स्वतः या शाळेचा माजी विद्यार्थी आहे आमच्या वेळी शाळा होती पण…आज ही शाळा खुप प्रगती पथावर आहे त्यामुळे निश्चितच भविष्यात शाळा भरपूर विद्यार्थी घडवेल यात शंका नाही.यावेळी विद्यार्थांना जवळ पास 300 बक्षीस वितरण करण्यात आली.

संपूर्ण शाळेला असलेल्या विद्युत रोषणाईने कार्यक्रमाची शोभा वाढविली. तर प्रमुख पाहुण्याच्या स्वागतासाठी इयत्ता 10 वी चे सर्व विद्यार्थी हजर होते.सदर कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक -वृंद,शिक्षकेतर कर्मचारी यांचे भरभरून आभार रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे व प्राचार्य मोहसिन शेख सर यांनी केले.मुख्य म्हणजे अगदी सर्व पालक वर्ग आपापल्या मुलांचे कौतुक मुक्त हस्ते करीत होते.

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचलन शाळेची विद्यार्थ्यांनी कुमारी श्रावणी महाले आणि प्रियल लोखंडे यांनी केले तर शाळेचे प्राचार्य मोहसिन शेख सर यांनी संस्था आज खुप प्रगती पथावर असल्याचे सांगितले.शेवटी क्रीडामार्गदर्शक अनुप गिरमे यांच्या नेतृत्वाखाली सर्व शिक्षक वृंदानी वंदे मातरम् गीत गाऊन या कार्यक्रमाची सांगता झाली.