
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव – येथील जेष्ठ नागरिक सेवा मंचाची स्थापना कै.भागचंद भाऊ ठोळे यांनी कै.पि.डी (दादा) गुजराथी,कै. भायबंग दादा,कै.सर्जेराव भोसले, प्रा.अमरनाथ लोंगानी,कै.दत्तात्रय डोंगरे सर,विजय बंब,दत्तोपंत कंगले, रजनीताई गुजराथी,आदी मान्यवरांच्या सहमतीने केली होती.जेष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी,मन मोकळे जगण्यासाठी आणि सामाजिक सेवेचा वसा जपण्यासाठी सदर मंच स्थापन करण्यात आला आहे. सातत्याने सामाजिक सेवेचा वसा जपण्यासाठी सदैव तत्पर असणारे “ठोळे ” कुटुंबिय नेहमीच समाजाप्रती असलेले आपले उत्तर दायित्व जपत आले आहे.कोपरगाव शहरातील पहिले विद्यालय, “श्रीमान गोकुळचंदजी प्राथमिक व माध्यमिक विद्यालय “गेले अनेक वर्षे ज्ञानदान करत आहेत आता पुढच्या पिढीने काळाची गरज ओळखून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पाऊल ठेवलेआहे.
जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या वतीने समाजातील गोरगरीब गरजूंना वैद्यकीय मदतीसाठी प्रवरा मेडिकल ट्रस्टच्या सहकार्याने सर्वरोग निदान व उपचार शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहेत.शहरासह ग्रामीण भागातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालयातील गरिब गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे (चप्पल बूट वह्या पुस्तके गणवेश आदी ) शिक्षकांच्या मदतीने देऊन मदतीचा हात दिला आहे.या शिवाय संघातील व समाजातील व्यक्तींचा वाढदिवसा निमित्त सन्मान करण्यात आला आहे इयत्ता दहावीच्या,बारावीच्या यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्याची परंपरा आजही कार्याध्यक्ष विजय बंब,उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले व ठोळे परीवाराने चालू ठेवली आहे.या बरोबरच समाजातील गोरगरीब व्यक्तींना दिपावलीचा आनंद साजरा करण्यासाठी,”ना नफा ना तोटा “या तत्त्वावर “दिपावली फराळ “योजना कै.दगडू महाराज उपाध्ये यांचे सहकार्याने चालू केली ती आजही कै. दगडू महाराज उपाध्ये यांची मुले रामु श्याम आजही वडिलांनी सुरू केलेला वसा जपण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.या बरोबरच ऐन दिवाळीत समाजाच्या सेवेसाठी तत्पर असणारे पोलिस,एस टी चे चालक वाहक,रेल्वेचे कर्मचारी यांनी सहकार्य केल्या निमित्ताने मोफत फराळ वाटप करण्यात येते आहे.जेष्ठ नागरिकांना विरंगुळ्यासाठी धार्मिक स्थळे प्रेक्षणीय स्थळे बघण्यासाठी सहलीचे आयोजन,गप्पा मारत मन मोकळे करण्यासाठी सहभोजन वन भोजन आदि उपक्रम कै.भागचंद भाऊ ठोळे यांनीच सुरू केले होते तीच परंपरा आज सुप्रसिद्ध उद्योजक कैलासचंद ठोळे,जेष्ठ नागरिक सेवा मंचच्या अध्यक्षा सौ सुधाभाभी ठोळे, लायन्स राजेश ठोळे यांनी आजही सुरू ठेवली आहे.कोरोना महामारीच्या कठीण काळात ठोळे परिवारातर्फे ग्रामीण रुग्णालयात,पोलीस स्टेशनच्या मदतीने वैद्यकीय,किराणा मालाच्या रुपाने भरघोस मदत केली आहे महापुराच्या काळातही निवारा,किराणा,वस्र आदि रुपाने मदतीला धावून आले आहेत.
आजही कै.भागचंद भाऊ ठोळे यांनी सुरू केलेल्या अनेक उपक्रमात उपाध्यक्ष दत्तोपंत कंगले,कार्याध्यक्ष विजय बंब,रजनीताई गुजराथी,ह भ प थोरे महाराज,पेंटर दारुवाला,उद्योजक चंद्रकांत शेठ ठोळे आणि इतरही अनेक जेष्ठ नागरिक हा वसा जपण्यासाठी झटत आहेत.कै.भागचंद भाऊ ठोळे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विनम्र अभिवादन.
- शब्दांकन – हेमचंद्र भवर
( कोपरगाव जेष्ठ नागरिक सेवा मंच )