Homeकोपरगावचहा व अन्नाने शरीराची भूक तरं भागतेच ; त्याचबरोबर आजीचं पुस्तकांचं हाॅटेल...

चहा व अन्नाने शरीराची भूक तरं भागतेच ; त्याचबरोबर आजीचं पुस्तकांचं हाॅटेल येथे मात्र बुध्दीचीही भूक भागते

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव :मुंबई आग्रा महामार्गावरील ओझर जवळ दहावा मैल येथे सौ. भिमाबाई संपत जोंधळे यांच हाॅटेल आहे.तेथे अनेक लोक चहा व जेवणासाठी थांबत असतात.चहा किंवा जेवण मिळेपर्यंत,प्रत्येक टेबलावर टोपली मध्ये वाचण्यासाठी ठेवलेल्या अनेक प्रकारच्या पुस्तकांची मेजवानी या हॉटेलमध्ये मिळते.त्यामध्ये अनेक कविता,साहित्यिक माहिती, छायाचित्रे,चित्र रेखाटले आहेत पर्यटकांनी इतर ठिकाणी पर्यटनाला वा खाण्यासाठी जाण्यापेक्षा या ठिकाणाला भेट दिली तर पोटासह बुद्धीचीही भुक भागते.

आजीशी गप्पा मारत असताना जुन्या आठवणींना उजाळा दिला जातो. अनेक जुन्या कविता आठवणी जाग्या होतात संघर्षातूनही आपला संसार प्रपंच सांभाळून जोंधळे आजीं पुस्तक प्रपंच सांभाळून व्यवसाय चालवत आहेत.थकल्या भागल्या मनाला उभारी मिळाली तर जीवन आनंदी होते
येथे आल्यावर मन प्रसन्न टवटवीत होते प्रवासाचा शीण निघून जातो.

कोपरगाव येथील साहित्यिक छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांनी येथे आजीच्या सोबत गप्पा मारत जुन्या आठवणींना उजाळा दिला.त्यावेळी जोंधळे आजी म्हणाल्या की,या ठिकाणी अनेक छोटे -मोठे कार्यक्रम होत असतात.धार्मिक,सामाजिक,साहित्यिक अशा कुठल्याही कार्यक्रमासाठी आम्ही मोफत जागा देऊन सर्वांच्या सुख – दु :खात सहभागी होत असतो. यावेळी जेष्ठ साहित्यिक डॉ.दादासाहेब गलांडे व मंसाराम पाटील लिखित ग्रंथ आजींना भेट दिला.यावेळी तेथील प्रसन्नता बघुन कोपरगाव येथील छायाचित्रकार हेमचंद्र भवर यांनी असे विचार व्यक्त केले कि,पर्यटकांनी इतर ठिकाणी पर्यटनाला जाण्यापेक्षा इथे भेट दिली तर ज्ञानाच्या कक्षा रुंदावत जातील व मनाला एक आगळी वेगळी शांतता मिळेल.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!