Homeकोपरगावब्रम्हलीन स्वामी लखनगिरीजी महाराज यांच्या १८ व्या पुण्यतिथी निमीत्त ज्ञानेश्वरी पारायण,किर्तन महोत्सव...

ब्रम्हलीन स्वामी लखनगिरीजी महाराज यांच्या १८ व्या पुण्यतिथी निमीत्त ज्ञानेश्वरी पारायण,किर्तन महोत्सव व सत्संग सोहळा

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगांव- दक्षिणकाशि गोदावरी नदीकाठावरील तालुक्यातील श्रीक्षेत्र कोकमठाण येथील कांचनवाडी व विभांडक ऋषी आश्रमात महान तपस्वी ब्रम्हलीन स्वामी लखनगिरीजी महाराज यांचा अठरावा पुण्यतिथी सोहळा २० ते २६ एप्रिल दरम्यान ज्ञानेश्वरी पारायण,अखंड हरिनाम सप्ताह,किर्तन महोत्सव व विविध धार्मीक कार्यक्रमाने संपन्न होत असुन या पुण्यतिथीची सांगता २७ एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता ह.भ.प. श्रीकृष्णकृपांकित डॉ विकासानंदजी महाराज मिसाळ यांच्या काल्याच्या किर्तनाने होणार आहे.

या पुण्यतिथी सोहळ्यानिमीत्त २० एप्रिल रोजी सकाळी ८.३५ वाजता ज्ञानेश्वरी पारायण प्रारंभानिमीत्त राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रमाचे प्रमुख मठाधिपती श्री श्री १००८ महंत प.पू.रमेशगिरी जी महाराज यांच्या हस्ते दीप व कलशपुजन,कुंभारी आश्रमाचे मठाधिपती श्री श्री १०८ महंत राघवेश्वरानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते ग्रंथपुजन होईल.

सकाळी ११ते १ या काळात हभप सर्जेराव महाराज टेके (२०एप्रिल), हभप विजय महाराज गुंजाळ (२१ एप्रिल),भागवताचार्य हभप शामसुंदर महाराज नानेकर (२२एप्रिल),हभप मुकेश महाराज होळंबे (२३ एप्रिल), हभप राहुल महाराज डुमरे (२४ एप्रिल),हभप अमोल महाराज गाडे (२५ एप्रिल),श्री श्री १००८ महामंडलेश्वर काशिकानंदजी महाराज (२६ एप्रिल), यांचा किर्तन महोत्सव साजरा होत आहे.२७ एप्रिल रोजी सकाळी ८ वाजता स्वामी लखनगिरी जी महाराजांच्या मुर्तीस ब्रम्हवृदांच्या मंत्रघोषात महामस्तकाभिषेक,महापुजा संपन्न होईल.

या पुण्यतिथी सप्ताह काळात अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत स्वामी शंकरानंदजी सरस्वती महाराज,श्री श्री १००८ गणेशानंदजी सरस्वती महाराज,श्रध्दानंदजी महाराज महांकाळ वडगांव,गोदावरी धामचे मठाधिपती महंत रामगिरीजी महाराज, श्री श्री १००८ महामंडलेश्वर काशिकानंदजी सरस्वती महाराज,गोपालनंदजी महाराज आदी संत महंत ब्रम्हलिन स्वामी लखनगिरीजी महाराज समाधी मंदिर स्थानावर उपस्थित राहणार आहेत.

तरी जास्तीत जास्त भाविकांनी या कार्यक्रमासाठी तनमनधनाने सहकार्य करून किर्तन व ज्ञानेश्वरी पारायण सोहळा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन कोकमठाण पंचकोशीतील लखनगिरीजी महाराज भक्त मंडळाचे सर्व सहकारी भाविकांनी केले आहे.पंचक्रोशीतील संवत्सर, कोकमठाण,सडे,पढेगांव, कासली,कोपरगांव बेट,जेउरकुंभारी, जेउरपाटोदा, माळवाडी,कारवाडी, शिंगवे,कुंभारी,भोजडे आदि गावातील भजनी मंडळींनी किर्तन महोत्सव यशस्वीतेसाठी उपस्थित राहुन सहकार्य करावे. विभांडक ऋषी मंदिर जीर्णोध्दार कार्यासाठी सढळ हाताने मदत करावी असेही आवाहन शेवटी करण्यांत आले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!