
कोपरगावात लोखंडेच्या प्रचार सभेत ना.फडणवीस यांचे आश्वासन
*****************************************************

उपमुख्यमंत्री ना.फडणवीस यांची कोल्हेच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
******************************************************

कोपरगाव येथे राज्याचे उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आले असता, कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे यांच्या येसगाव येथील निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.बिपीनदादा कोल्हे यांनी सत्कार केला.तर ना.फडणवीस यांचे सौ.रेणूकाताई कोल्हे व श्रद्धाताई कोल्हे यांनी त्यांचे औक्षण केले.या प्रसंगी नितीनदादा कोल्हे,अमितदादा कोल्हे,सुमितदादा कोल्हे इशानभैय्या कोल्हे आदीसह कोल्हे परिवार उपस्थित होते.
*****************************************************
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : सहकार महर्षी स्व.शंकरराव कोल्हे यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळविण्याचा विचार करून कार्यान्वित ही केला.तसाच प्रयत्न मा. आ.सौ. स्नेहलताताई कोल्हे यांनी केला आणि तिसऱ्या पिढीतील युवानेते विवेकभैय्या कोल्हे यांनीही आग्रही असतांना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पश्चिमेचे पाणी पूर्वेला वळवून पाण्याचा प्रश्न मार्गी लावू असे सूतोवाच केले आहे.या भूमिकेमुळे पाणी प्रश्नाची सोडवणूक होण्यास मदत मिळणार आहे.

देवेंद्र फडणवीस कोपरगाव येथे तहसिल कार्यालय मैदानात (दि.९) दु.१२ वाजेदरम्यान आयोजित महायुतीचे उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या शिर्डी लोकसभा निवडणुकीच्या प्रचारार्थ विजय संकल्प जाहीर सभेत बोलत होते.याप्रसंगी व्यासपीठावर केंद्रीय मंत्री भागवत कराड,बांधकाम मंत्री दादा भुसे,विधान परिषदेच्या सभापती नीलम गोऱ्हे,संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष श्री.बिपीनदादा कोल्हे,कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आ.सौ.स्नेहलताताई कोल्हे,आ.आशुतोष काळे,आ.संजय शिरसाठ, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे,शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष नितीन औताडे,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे,रवींद्र बोरावके आदीसह विविध आजी माजी पदाधिकारी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
ते पुढे आपल्या भाषणात म्हणाले की,पश्चिमेचे नद्यांचे पाणी वाहून जाऊन समुद्राला मिळते,ते पाणी पूर्वेला गोदावरी नदीची पाण्याची तूट भरून काढण्यासाठी आराखडा तयार करून मंजुरीसाठी पाठवला असून तो लवकरच मंजूर होईल,या साठी लागणार निधी लागेल,त्यावेळी मोदी है तो मूमकिन है अस म्हणत पाण्याचा प्रश्न मार्गी लावू.यासाठी ५० हजार कोटी निधी आवश्यक आहे.तो देण्यासाठी मोदी आहेत.लवकरच हा आराखडा मंजूर करून हा प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले.
कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आ.सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे यांचे नाव घेत ना.फडणवीस म्हणाले की,ताई आमदार असतांना कोपरगाव तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी दिला आणि विकास केला आहे.यापुढेही विकासासाठी सहकार्य करत सरकार म्हणून गेल्या काही काळात मोठा निधी कोपरगावसाठी देण्यात आला आहे.तोट्यात जाणार साखर कारखानदारी व ऊस उत्पादक यांना जगविण्याचे काम मोदी यांनी केले.शेतकऱ्यांचे १० लाख कोटी रु.चे उत्पन्न कर माफ केले.साखर कारखाने चालावे आणि ऊस उत्पादकांना भाव मिळावा यासाठी निधी उपलब्ध करून दिले आहे.इथेनॉल निर्मितीची मंजुरी देऊन शेतकऱ्यांचे आश्रू पुसण्याचे काम मोदी यांनी केले आहे.त्यामुळे पुन्हा एकदा सदाशिव लोखंडे याना निवडून देऊन नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याची आवाहन उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केले.

या प्रसंगी कोपरगाव मतदार संघाच्या पहिल्या महिला आ.सौ.स्नेहलताताई बिपीनदादा कोल्हे आपल्या भाषणात म्हणाल्या की,स्व.शंकररावजी कोल्हे साहेब यांची अशी शिकवण होती की,देश हितासाठी आणि समाज विकासासाठी एकत्र यायचे आणि त्यांनी ही पण शिकवण दिली आहे की, कुठे लढायचं आणि कुठं थांबायचं,आम्ही एकत्र आहोत,नरेंद्र मोदी आपल्याला परिवार मानतात,म्हणून दिवाळी सैनिकासोबत साजरी करतात आणि शत्रूंना धडकी भरवणारे सक्षम नेतृत्व नरेंद्र मोदी आहेत.रशिया आणि युक्रेन युद्धात आपल्या देशवासियांना सुखरूप आणणारे मोदी आहेत.कोरोना काळात देशाला लसीकरण करून एकही भूकबळी होऊ दिली नाही.घरकुल,आयुष्यमान भारत, उज्वला योजना,आदी योजना दिल्या.आदिवासी महिलेला न्याय देण्याचे काम त्यांनी केलं.लवकरच महिलांना ५० टक्के आरक्षण देणार आहेत.बचत गट महिलांना न्याय देण्याचे काम त्यांनी केलं आहे.राज्यात उपमुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या माध्यमातून कोपरगाव शहरातील नगर परिषद,बस स्थानक,पोलीस ठाण्याची इमारत,पंचायत समितीची कामे करता आली.म्हणून महायुतीच्या उमेदवार सदाशिव लोखंडे यांना मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन केले.