Homeराहुरीजिल्हाधिकारी मा.श्री.सिद्धराम सालीमठ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण रुग्णालयातील सेवकांचे मतदारांना जाहीर...

जिल्हाधिकारी मा.श्री.सिद्धराम सालीमठ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामीण रुग्णालयातील सेवकांचे मतदारांना जाहीर आवाहन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव :- येत्या लोकसभा निवडणुकीत राहुरी शहरासह सर्व अहमदनगर जिल्ह्यातील मतदारांनी मतदान करण्याचे आवाहन राहुरी ग्रामीण रुग्णालयाच्या सर्व कर्मचारी व अधिकारी वर्गाने केले आहे.

जिल्हाधिकारी श्री सिद्धराम सालीमठ यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत, जास्तीत जास्त मतदारांचे मतदान करुन घेण्यासाठी मिशन -७५ या मोहीमेचा एक भाग म्हणून आज ग्रामीण रूग्णालयात राहुरी येथील सर्व कर्मचारी बंधू भगिनी व उपस्थित रुग्ण यांनी मतदानाची शपथ घेतली.

यावेळी वैद्यकिय अधिकारी डाॅ.मिसाळ सर यांनी सर्व कर्मचारी व रूग्णांना सहकुटुंब मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन केले.मतदान हे आपले राष्ट्रीय कर्तव्य आहे तसेच संविधानाने प्रत्येकाला दिलेला हक्क हा प्रत्येक जबाबदार नागरिकाने तो पूर्ण केलाच पाहिजे असे प्रतिपादन ज्ञानेश्वर इघे यांनी केले.तसेच समुपदेशक शेळके मॅडम व श्री.आहेर सर यांनी मतदानाची प्रतिज्ञा उपस्थितांना दिली.

यावेळी राहुरी स्वीप सदस्य अनिल विधाते व गणेश शिंदे उपस्थित होते. स्वीप नोडल अधिकारी मोहिनीराज तुंबारे यांच्या मार्गदर्शनाने मतदार जाणीव जागृती मोहिमेत सर्वांनी सामील व्हावे असे आवाहन त्यांनी केले.

रूग्णालयातील सर्व कर्मचारी यासमयी उपस्थित होते.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!