Homeनाशिकयेवलाराज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याचे शिर्डी येथे आयोजन

राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्याचे शिर्डी येथे आयोजन

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – येवला तालुक्यातील शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान आयोजित शहादू शिवाजी वाघ स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय तिसऱ्या साहित्य कलाकृती पुरस्कार सोहळ्यासाठी महात्मा गांधी विद्या मंदिर संचलित, कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.भाऊसाहेब गमे यांची कार्यक्रमाचे उद्घाटकपदी तर राहाता तालुक्यातील कोल्हार या  ग्रामीण भागातील ख्यातनाम कवी प्रा.शशिकांत शिंदे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे.दि.४ जून २०२४ रोजी होणाऱ्या या कार्यक्रमात शिवाबाबा वाघ प्रतिष्ठानच्या पुरस्कार प्राप्त सर्व कलाकृतींचा सन्मान करण्यात येणार आहे.अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष संजय वाघ यांनी दिली आहे.

शिवाबाबा वाघ प्रतिष्ठान,पिंपळगाव जलाल,ता.येवला जि.नाशिक आयोजित शहादू शिवाजी वाघ यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय साहित्य कलाकृती पुरस्काराचे आयोजन शिर्डी येथे करण्यात आले आहे.यासाठी महाराष्ट्रातून कविता संग्रह-४७,कथा संग्रह-१७,कादंबरी -५ आणि ललित लेखसंग्रह-११ अशा एकूण ८०विविध प्रकारच्या साहित्य कलाकृती पुरस्कारासाठी प्राप्त झाल्या होत्या.या कलाकृतीतून प्रत्येक साहित्य प्रकारातील एक कलाकृतीला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार जाहीर झाला आहे. तसेच राज्यस्तरीय काव्यलेखन स्पर्धेचे नियोजन केले असून त्याही स्पर्धेचा निकाल जाहीर झाला आहे.एकूण चार विविध साहित्य प्रकारातील कलाकृतींचा व काव्यलेखन स्पर्धेत निवड केलेल्या कवींचा या ठिकाणी सन्मान करण्यात येणार आहे.या कार्यक्रमाचे उद्घाटक प्राचार्य डॉ. भाऊसाहेब गमे सर व प्रा.शशिकांत शिंदे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

सदर कार्यक्रमाचे उद्धाटक प्राचार्य गमे सर यांना वरिष्ठ महाविद्यालयात ३० वर्षाचा अध्यापनाचा अनुभव आहे तसेच दि. २००५ व पुढे ०७ जुलै २०१० पर्यंत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी अभ्यास मंडळाचे सदस्य व कला शाखेचे सदस्य होते. सध्या एम फिल व पीएचडी चे मार्गदर्शक आहेत.एमफिल व पीएचडी प्रत्येकी एक विद्यार्थ्यांला पदवी मिळाली ७ विद्यार्थी संशोधन करीत आहेत.तर झुनझुन JJTU राजस्थान येथे पीएचडी अभ्यासक्रमासाठी सहपर्यवेक्षक,सहमार्गदर्शक म्हणून दि.२८ जून २०१७ पासून ते काम पहात आहेत.त्यांची वैयक्तिक २ व संपादीत ४ संदर्भ ग्रंथ प्रकाशित आहेत.

त्याचप्रमाणे कार्यक्रमाचे अध्यक्ष राहाता तालुक्यातील कोल्हार या ग्रामीण भागातील ख्यातनाम कवी प्रा.शशिकांत शिंदे यांना या अगोदर अनेक ठिकाणी निमंत्रित कवी म्हणून निवड झालेली आहे तसेच त्यांना विविध पुरस्काराने सन्मानित ही करण्यात आले आहे.त्यामध्ये पद्मश्री विखे पाटील नवोदित साहित्यिक प्रकाशन पूर्व पुरस्कार,डॉ.बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप अवार्ड ऑफ दलित साहित्य अकादमी नवी दिल्ली, कुसुमाग्रज काव्य पुरस्कार असे नामांकित विविध पुरस्कार प्रा.शिंदे यांना मिळालेले आहेत.अशा या नामांकित मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी मा.प्राचार्य डॉ.भाऊसाहेब गमे सर यांची उद्धाटक पदी तर प्रा.शशिकांत शिंदे सर यांची अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!