
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : शिक्षणमहर्षी,माजी मंत्री दिवंगत शंकरराव कोल्हे साहेब यांनी सन 1978 मध्ये ग्रामीण भागातील मुलांना इंग्रजी भाषेत शिक्षण मिळावे यासाठी सुरू केलेल्या संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूल मधील मार्च 2024 मध्ये एस.एस.सी.परीक्षेचा निकाल 100% लागला आहे.सदर परीक्षेसाठी शाळेतील 67 विदयार्थी बसले होते पैकी सर्व उत्तीर्ण झाले आहेत.90% पेक्षा जास्त चार विद्यार्थी,80% पेक्षा जास्त 37 विद्यार्थी,70% पेक्षा जास्त चौदा विद्यार्थी,60% पेक्षा जास्त सहा विद्यार्थी,50% पेक्षा जास्त सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
देवकर सायली सुनील 92%(प्रथम),कापसे अनिकेत बाळासाहेब 90.83% (द्वितीय),भोसले पुर्वा केशव 90.66%(तृतीय),भोसले अदिती सोमनाथ 90. 40%(चतुर्थ),कापसे आयुष संदीप 89.80%(पंचम), आभाळे स्वयम राजेंद्र 89.80%(पंचम) क्रमाने विद्यार्थी गुणवत्तेने उत्तीर्ण झालेले आहेत शाळेने यावर्षी सुद्धा उज्वल यशाची परंपरा कायम राखली आहे.
उत्तीर्ण सर्व विद्यार्थ्यांचे,गुरुजनांचे, पालकांचे अभिनंदन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष आदरणीय श्री.बिपिनदादा कोल्हे साहेब,प्रथम महिला आमदार आदरणीय सौ.स्नेहलताताई कोल्हे साहेब,संस्थेचे अध्यक्ष आदरणीय विवेकभैय्या कोल्हे साहेब,संस्थेच्या मॅनेजिंग ट्रस्टी आदरणीय सौ.रेणुकाताई विवेकभैय्या कोल्हे,शाळेचे प्राचार्य मोहसीन शेख सर, शाळेतील सर्व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी,पालक वर्ग,विद्यार्थी सर्वांनी हार्दिक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.