
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – पांढरा शर्ट डोळ्यावर चष्मा साधी राहणी ग्रामीण भागातील. जनते बरोबर गावात ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करताना न्याय मिळाला पाहिजे शासकीय योजनेचा लाभ मिळावा यासाठी कायम अविरत जवळपास नगर जिल्ह्यातील जिल्हा परीषदेच्या माध्यमातून जास्त काळ कोपरगाव तालुक्यात सेवा केलेल्या माहेगाव देशमुख कोळपेवाडी येथील ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी गोरक्षनाथ पंढरीनाथ शेळके यांचा ३१मे रोजी शिर्डी येथील साई आश्रया अनाथ आश्रमात होत असलेल्या सेवापूर्ती कार्यक्रमा निमित्त त्यांच्या सेवेचा घेतलेला हा छोटासा आढावा
सिन्नर तालुक्यातील मिरगाव ही त्यांची जन्मभूमी तर नगर जिल्ह्या त्याची कर्मभूमी ठरली आहे वडील पंढरीनाथ शेळके यांचे बालपणातच निधन झाले दोन भाऊ दोन बहिणी असा त्यांचा परिवार अंध आई हौशाबाई पंढरीनाथ शेळके वय ९० हिने संकटाला न घाबरता दोन हात करत मोठे काबाड कष्ट करून मुलांना शिकवत चांगले संस्कार देउन आदर्श आई कशी असते यांचा आदर्श समाजा समोर ठेवला गोरक्षनाथ,एकनाथ, आशाबाई, कुसुम हि बहीण भावंडं.घरची परिस्थिती गरिबीची अठरा विश्व दारिद्र्य परंतु पतीच्या निधनामुळे न खचता त्या संकटाला सामोरे जात मुलांना चांगले शिक्षण दिले भाऊ गोरक्षनाथ याला शासकीय नोकरी मिळाल्यामुळे आई हौशाबाई व भाउ एकनाथ यांना मोठा आनंद झाला एकनाथ शेळके हे शेतकरी आहे तर बहीणी कुसुम पांडुरंग थोरात, आशाबाई मधुकर सरोदे कोळपेवाडी हे सुखात वाटचाल करीत आहे.सध्या कोळपेवाडी येथे असलेले ग्रामविकास अधिकारी गोरक्षनाथ शेळके यांनी ३५ वर्षे सहकाराच्या नगर जिल्ह्यात तालुका अध्यक्ष कोपरगाव विविध गावात ग्रामविकास अधिकारी म्हणून काम केले कोपरगाव तालुक्यात १४ वर्षे काम करून त्यांनी आपल्या कामाचा मोठा ठसा उमटवला या काळात पत्नी शोभा शेळके यांनी देखील त्यांना मोठी साथ दिली त्यांना दोन मुले असून डॉक्टर रवींद्र हे वैद्यकीय क्षेत्रात कोपरगाव येथे काम करतात देवेंद्र हे सिव्हिल इंजिनिअर आहेत त्यांच्या सुना सौ राणी आणि पूजा त्यादेखील उच्चशिक्षित आहे शासकीय सेवेतील काळ व कौटुंबिक जीवन याबाबत बोलताना गोरक्षनाथ शेळके म्हणाले की गरिबीचे असलेली जानीव. बालपणात केलेला संघर्ष कमी वयात हरवलेले वडीलाचे छत्र यामुळे शासकीय मिळालेली नोकरीत काम करताना समाजासाठी असलेली बांधिलकी कायम ठेवली आपण नेहमीच ग्रामविकास अधिकारी म्हणून काम करताना शासकीय योजनेचा लाभ गोरगरीब सर्वसामान्य जनतेला मिळाला पाहिजे यासाठी आपण काम केले या काळात आपल्याला नगर जिल्ह्यातील ग्रामसेवक संघटनेच्या अध्यक्षपदाची देखील संधी मिळाली पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन म्हणून देखील आपण काम केले या कामाच्या माध्यमातून मोठा जनसंपर्क देखील आपल्याला मिळाला आपण केलेल्या कार्यामुळेच मिळणारे समाधान व कुटुंबाला मिळालेली स्थिरता यातच मोठे समाधान असून सेवापुर्ती कार्यक्रम एक आनंदाचा क्षण असला तरी या ३५ वर्षाच्या वाटचालीत अनेक सुख दुःखाचे अनुभव पाठीशीअसताना अनेकांनी केलेले सहकार्य यामुळे हे शक्य झाले आहे यापुढेही वाटचाल करताना सामाजिक बांधिलकी म्हणून आपण समाजाप्रती योगदान देतच असल्याचे सांगितले.