
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
श्री कालभैरवनाथ शिक्षण प्रसारक मंडळ संचलित एस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कूल शहा.या शाळेने १००% निकालाची परंपरा जपली असल्याची माहिती शाळेचे संस्थापक अध्यक्ष मा. संभाजी जाधव सर यांनी दिली आहे.
या परीक्षेस चालू वर्षासाठी एकूण 24 विद्यार्थ्यांपैकी 4 विद्यार्थ्यांनी ९०% पेक्षा जास्त गुण मिळविले तर ८० % च्या पुढे 2O विद्यार्थ्यांनी यश संपादन केले असल्याची माहीती प्राचार्य निळकंठ सर यांनी सांगितले.
सिन्नर तालुक्यातील शहा या खेडेगावातील इयत्ता दहावीमध्ये कु.सरवार सानिका किशोर हिने 93.4O %, गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकविला तर द्वितीय क्रमाक कु.पेखळे वैष्णवी राजेंद्र हिने 92.6O%, कु.पेखळे समीक्षा सोमनाथ हिने 92.4O % गुण मिळविले आहे आणि कु.कासार साईशा विजय हिने 91.4O % गुण मिळविले असून वरील विद्यार्थीनींसह आदि 2O विद्यार्थी – विद्यार्थीनींनी एस डि जाधव इंग्लिश मिडियम स्कूलची 1OO % निकालाची परंपरा टिकविली आहे.
त्याचप्रमाणे चार विद्यार्थीनींनी नव्वद टक्के पेक्षा जास्त गुण मिळवून तालुक्यातील ग्रामीण भागात शाळेचा नावलौकिक वाढविला आहे. या आगोदरही या शाळेने इयत्ता दहावीच्या शंभर टक्के निकालाची परंपरा जपलेली असून दरवर्षी जास्तीत जास्त विद्यार्थी नव्वद टक्केपेक्षा जास्त टक्केवारी मिळवित आलेले आहेत.यासाठी अथक परिश्रम घेणारे उच्च विभूषित शिक्षक आणि दर्जेदार शिक्षण प्रणाली यामुळे शाळा पालकांच्या विश्वासास पात्र ठरत आहे.
शाळेतील सर्व शिक्षक – शिक्षिका हे सुरुवातीपासूनच कठीण परिश्रम घेऊन विद्यार्थी सर्व गुण संपन्न घडवून सर्वोत्कृष्ट निकाल लावण्याचा प्रयत्न करतात.यामध्ये विद्यार्थ्यांच्या चाचणी परीक्षा,गटचर्चा,प्रश्न उत्तरे,वादविवाद अशा विविध पद्धतीने शिक्षक विद्यार्थ्यांना घडविण्याचे काम या शाळेमध्ये करतात.
एस डी जाधव इंग्लिश मिडियम स्कूलने शहा सारख्या ग्रामीण भागात १०० टक्के निकालाची परंपरा टिकविण्याचा आटोकाट प्रयत्न केला आहे. यशस्वी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे संस्थेचे संस्थापक,प्राचार्य,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,पालक यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. त्याचबरोबर यशस्वी सर्व विद्यार्थ्यांचे पंचक्रोशितून सर्वत्र अभिनंदन होत आहे.