Homeकोपरगावएस.एस.जी.एम.कॉलेजच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ.उज्ज्वला भोर यांची नियुक्ती

एस.एस.जी.एम.कॉलेजच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा.डॉ.उज्ज्वला भोर यांची नियुक्ती

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव – येथील रयत शिक्षण संस्थेच्या एस.एस.जी.एम.कॉलेजचे प्र.प्राचार्य डॉ.रमेश सानप हे शासकीय नियमानुसार व नियत वयोमाना नुसार ३१ मे २०२४ रोजी सेवानिवृत्त झाले.त्यामुळे रयत शिक्षण संस्थेने एस.एस.जी.एम.कॉलेजच्या प्रभारी प्राचार्य पदी महाविद्यालयातील मराठीच्या सीनियर प्राध्यापिका प्रा.डॉ.उज्ज्वला भोर यांची दि.०१ जून २०२४ पासून नियुक्ती केली आहे.

प्रा.उज्ज्वला भोर यांनी पाथर्डी येथील बाबूजी आव्हाड महाविद्यालयात १५ वर्ष प्रभावीपणे सेवा केली असून तेथील परिसर व सांस्कृतिक वर्तुळातही आपल्या कार्याने वेगळी ओळख निर्माण केली आहे.पाथर्डी साहित्य संमेलनाचे कार्याध्यक्ष पदही त्यांनी भूषविले आहे.रयत शिक्षण संस्थेत २०१० पासून त्या मराठीच्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत झाल्या.लोणंद, सातारा,श्रीरामपूर येथे त्यांनी आपली सेवा बजावली असून मराठी विभाग प्रमुख,मराठी संशोधन केंद्र -समन्वयक,राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक,पुणे ते पंढरपूर पायी दिंडीच्या दिंडी प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे सांभाळल्या आहेत.

२०१९ साली प्रोफेसरपदी त्यांची निवड झालेली असून रयत शिक्षण संस्थेतील त्या पहिल्या महिला प्रोफेसर ठरल्या आहेत.सातारा येथे कार्यरत असताना कर्मवीर विद्या प्रबोधिनीमध्ये त्यांनी वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.त्यांनी संपादित केलेल्या ‘भरारी’ या वार्षिकांकातील लेखांना पारितोषिके मिळाली आहेत.संशोधन क्षेत्रातही त्यांनी आपली अशी ओळख निर्माण केली आहे.त्यांच्या मार्गदर्शनाने ०४ विद्यार्थी नेट,सेट पात्रता परीक्षा पहिल्या प्रयत्नात उत्तीर्ण झाले आहेत.विद्यापीठ अनुदान आयोगाला त्यांनी आपला दीर्घ संशोधन प्रकल्प सादर केलेला असून, एम. फिल.पीएच.डी.च्या मार्गदर्शक म्हणूनही त्या कार्यरत आहेत.आजपर्यंत त्यांचे ०३ विद्यार्थी एम.फिल.पदवी तर ०४ विद्यार्थी पीएच.डी.पदवी प्राप्तकर्ते झाले आहेत.त्यांच्या नावावर ०६ ग्रंथ प्रकाशित असून ४५ च्या वर शोध निबंध विविध नियतकालिकांतून प्रकाशित झालेले आहेत.

प्रा.डॉ.उज्ज्वला भोर यांच्या प्रभारी प्राचार्यपदी झालेल्या निवडीचे सर्व सहकाऱ्यांनी स्वागत केले असून रयत शिक्षण संस्थेचे व्हा.चेअरमन व महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन मा.ॲड.भगीरथकाका शिंदे, सदस्य मा.चैतालीताई काळे,मा.विवेकभैय्या कोल्हे,मा.ॲड.संदीप वर्पे, मा.श्री.सुनील गंगुले,मा.श्री.बाळासाहेब आव्हाड,मा.श्री.महेंद्रकुमार काले, तसेच रयत शिक्षण संस्थेच्या जनरल बॉडीचे सदस्य मा.श्री.कारभारी आगवण,मा.श्री.पद्माकांत कुदळे,मा.श्री.एम.टी.रोहमारे,मा.श्री.अरुण चंद्रे यांच्यासह डॉ.रमेश सानप,कार्यालय अधीक्षक श्री.सुनील गोसावी, महाविद्यालय विकास समिती सदस्य डॉ.बाबासाहेब शेंडगे,डॉ.देविदास रणधीर,नॅक मानांकन मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका असणारे नॅक कॉर्डिनेटर डॉ. निलेश मालपुरे,डॉ.प्रतिभा रांधवणे,डॉ.माधव यशवंत, उपप्राचार्य डॉ.बाबासाहेब वर्पे,डॉ.अर्जुन भागवत,श्री.संजय शिंदे,ज्येष्ठ प्रा.डॉ.मोहन सांगळे यांच्यासह सर्वांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!