
॥ “असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी ” ॥
मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव :,आज संपूर्ण जगात 45 दशलक्ष लोक अंध आहे त्यापैकी एक तृतीयांश म्हणजे १५ दशलक्ष लोक हे भारतात आहेत. “असेल दृष्टी तर दिसेल सृष्टी ” यास अनुसरून डॉ. रामचंद्र लक्ष्मण भालचंद्र यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दरवर्षी १० जुन हा दिवस जागतिक दृष्टीदान दिवस म्हणून साजरा केला जातो. त्यांनी शासकीय सेवेत असताना ८० हजाराहून अधिक दृष्टीहिन गरजुचे यशस्वी नेत्रशस्त्रक्रिया करून त्यांचे जीवन प्रकाशमय केले आहे. त्यांचा मृत्यू १० जून १९७९ साली झाला,त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या योगदानाची व कार्याची दखल घेऊन शासनाने तीनच वर्षात म्हणजे १९८२ सालापासून १० जून हा जागतिक दृष्टीदान दिवस म्हणून साजरा करण्यास सुरुवात केली आहे.
इतकी वर्षे झाली परंतु आजही नेत्रदान करण्याचे प्रमाण कमी असून या मागे अंधश्रद्धा ही कारणीभूत ठरत आहे, जस की नेत्रदान केल्यावर पुनर्जन्म मिळत नाही,पुढच्या जन्मी अंध जन्माला येईल असं एक ना अनेक अंधश्रद्धा मनामध्ये घर करून बसल्या आहेत. एखाद्या व्यक्तीला जन्मतः एखादा अवयव नसणं म्हणजे याचा संबंध फक्त आणि फक्त हा डीएनअे ( DNA ) शी असतो,अंधकारमय जग प्रकाशमान करण्यासाठी नेत्रदान करणे गरजेचे आहे,दृष्टी नसेल तर हे निसर्गाने निर्माण केलेले सुंदर जग पाहता येणार नाही,पण सध्या मोबाईल,इंटरनेटमुळे जग खूप जवळ आले असले तरी त्याच्यामुळे अंधत्व येण्याच्या तक्रारी वाढू लागल्या आहे.
नेत्रादान,अवयदान,देहदान याविषयी जनजागृती व्हावी व सर्वश्रेष्ठ दानांपैकी दृष्टीदानाचे प्रमाण वाढावे यासाठी डॉ.अशोक गावित्रे हे अहोरात्र मेहनत घेत आहे. ते स्वतः डॉक्टर असल्याने आपल्या दैनंदिन कामाबरोबर त्यांनी शाळा,कॉलेज,महाविद्यालय यामध्ये अनेक वर्षापासून कार्यशाळा आयोजित करुन अवयवदाना विषयी जनजागृती करत आले आहे. त्याचबरोबर साईबाबा संस्थान याठिकाणी नेत्र पेढी उभी राहावी यासाठी ते गेली अनेक वर्षांपासून प्रयत्नशील आहेत.
नेत्रदान हे दोन वर्षांपासून ते एैशी वर्षापर्यंतचे स्त्री,पुरुष मृत्यूनंतर करू शकतात.मोतीबिंदू,नंबरचा चष्मा लागलेली व्यक्ती देखील नेत्रदान करू शकते, फक्त Hiv, Hepatitis B, cancer यासारख्या संसर्गजन्य आजार झालेली व्यक्ती नेत्रदान करू शकत नाही.,यासाठी एक फॉर्म भरावा लागतो त्यासाठी शासनाने एक क्युआर कोड डेव्हलप केला असून त्यावर वेबसाईट ओपन होते व त्यात माहिती भरून सबमिट केली की त्यांचा मोबाईल वर डोनर कार्ड देखील येते,नेत्रदानाची इच्छा व्यक्त केलेली व्यक्ती मृत पावल्याबरोबर त्यांच्या नातेवाईकांनी संबधीत डॉक्टरांना कळवले तर नेत्रदान हे घरी, हॉस्पिटलमध्ये,समशानभूमी येथे देखील करता येते यासाठी दहा ते पंधरा मिनिटं लागतात व काढलेले बुबुळे हे बुबुळे बाटलीत दोन दिवसापर्यंत ठेवता येतात तसेच विशिष्ट रसायने मध्ये हे काही आठवडे पर्यत ठेवता येतात नेत्रदान हे मृत्यूनंतर सहा तासांच्या आत करावे लागते, एका व्यक्तीच्या नेत्रदानाने दोन अंध व्यक्तीला दृष्टी प्राप्त होते,याची खरेदी किंवा विक्री होत नसते यावर NOTTO, ROTTO, SOTTO, ZTCC यांचं नियंत्रण असते.
आजच्या दिवशी खालील दिलेला कोड स्कॅन करून नेत्रदानचा फॉर्म भरू घ्या व या चळवळीत सामील होवूया.

अधिक माहितीसाठी व मदतीसाठी डॉ.अशोक गावित्रे,नेत्रदान, अवयदान,देहदान समुपदेशन, मो 7972677781 येथे संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.