Homeकोपरगावधारणगाव पंचक्रोशितील जास्तीत जास्त पात्र महिलांनी ''मुख्यमंत्री लाडकी बहीण " योजनेचा लाभ...

धारणगाव पंचक्रोशितील जास्तीत जास्त पात्र महिलांनी ”मुख्यमंत्री लाडकी बहीण ” योजनेचा लाभ घ्यावा- सरपंच सौ.वरुणाताई दिपक चौधरी

धारणगाव पंचक्रोशितील जास्तीत जास्त पात्र महिलांनी ”मुख्यमंत्री लाडकी बहीण ” योजनेचा लाभ घ्यावा- सरपंच सौ.वरुणाताई दिपक चौधरी

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव :- महाराष्ट्र राज्य सरकारच्या वतीने ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण’ या योजनेची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री ना. अजितदादा पवार यांनी पावसाळी अधिवेशनात अर्थसंकल्प मांडताना केली असुन कोपरगाव तालुक्यातील धारणगाव पंचक्रोशातील जास्तीत जास्त पात्र महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन धारणगावच्या प्रथम महिला लोकनियुक्त सरपंच सौ.वरूणाताई दिपक चौधरी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

पुढे आपल्या प्रसिद्धी पत्रकात सरपंच.सौ.वरुणाताई चौधरी यांनी म्हटले आहे की,महाराष्ट्र राज्य सरकारने “मुख्यमंत्री लाडकी बहिण” हि अत्यंत
महत्वाची योजना राज्यातील २१ वर्षे वय पूर्ण केलेल्या मुलीपासून ते ६५ वर्षे वय असलेल्या महिलांसाठी सुरू केली असून या योजनेद्वारे राज्यातील पात्र महिलांना शासनाच्या नियम व अटी नुसार जुलै २०२४ पासून महिन्याला एक हजार पाचशे रुपये म्हणजेच १५०० रुपये महिलेच्या बँक खात्यावर जमा होणार आहे/मिळणार आहे.

शासकीय निकषानुसार पात्र महिलांनी स्वतःचे 1)आदिवास प्रमाणपत्र किंवा पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड झेरॉक्स किंवा मतदान कार्ड झेरॉक्स, किंवा जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला यापैकी एक पुरावा आवश्यक आणि यापैकी नसेल तर उत्पन्नाचा दाखला द्यावा, 2 ) आधारकार्ड झेरॉक्स, 3) बँक पासबुक झेरॉक्स, ४ ) पात्र महिलेचा फोटो आणि अर्जदार महिलेचे स्वयंघोषणा पत्र /हमीपत्र आदी आवश्यक कागदपत्र घेऊन ऑनलाईन फॉर्म भरण्याची व्यवस्था वैभव वहाडणे किंवा दत्तात्रय पवार यांच्या सेतु कार्यालय मार्फत भरण्याची व्यवस्था धारणगाव ग्रामपंचायत कार्यालयाने महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून करण्यात आली असल्याचे माहिती सरपंच सौ.वरुणाताई चौधरी यांनी दिली आहे.

त्याचबरोबर सदर योजनेचा ऑफलाईन फॉर्म धारणगाव ग्रामपंचायत कार्यालय समोरील योगेश वेणूनाथ चौधरी यांच्या किराणा दुकानात उपलब्ध करण्यात आले आहे

सदर ऑफलाईन फॉर्म कसा भरायचा याची माहीती धारणगाव ग्रामपंचायत कार्यालयाच्या बाहेर माहिती फलकावर एक फॉर्म भरून लावण्यात आली असून त्याप्रमाणे प्रत्येकाने ऑफलाईन फॉर्म भरून ऑनलाईन फॉर्म सेतू मध्ये भरून घ्यावा असेही शेवटी सांगितले.

किंवा
त्या कागदपत्रासह सेतू केंद्र,ऑनलाइन संगणक प्रणाली,मोबाईल अॅप या माध्यमाचा वापर करत लाभ मिळविण्यासाठी ऑनलाइन अर्ज करावयाचा आहे. विशेष म्हणजे या योजनेकरिता ऑनलाइन फॉर्म भरण्याची अंतिम मुदत ३१ ऑगस्ट २०२४ पर्यंत वाढविण्यात आली असून पात्र महिलांनी ३१ ऑगस्ट पर्यंत जरी अर्ज केला तरी तिला जुलै या महिन्या पासूनच शासकीय नियम व अटी नुसारच १५०० रुपयेचा आर्थिक लाभ सुरू होणार आहे त्यामुळे महिलांनी घाई करू नये तसेच ५ एकर शेतीची अट देखील शासनाने रद्द केल्याने सरसकट सर्व पात्र शेतकरी महिलांना देखील या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच आपल्या घरातील पात्र २१ वर्षीय एक अविवाहित मुलीला देखील या योजनेचा लाभ घेता येणार असल्याचेही सरपंच सौ.चौधरी यांनी सांगितले आहे.

अधिक माहितीसाठी महिलांनी ग्रामपंचायत कार्यालय धारणगाव येथे संपर्क साधण्याचे आवाहन सरपंच सौ. वरुणाताई दिपक चौधरी यांनी शेवटी केले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!