
॥ शहरातील महिलांची पाण्यासाठी नगरपालिकेकडून ससेहोलपट होत असल्याची खंत !!

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : – जुलै महिना सुरू झाला असून दोनच दिवसापूर्वी नगरपालिकेने ४ दिवसाआड होणारा पाणीपुरवठा हा परिपत्रक काढून १० दिवसाआड केला असून काही भागात तर तो १२ दिवसाआड होईल की काय अशी चिंता माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या प्रसिध्दी पत्रकात व्यक्त केली आहे.
पुढे आपल्या प्रसिद्धी पत्रकात श्री.पाटील म्हणाले की,कोपरगाव नगरपालिकेने ज्या दिवशी पाणी मिळणार त्याच दिवशी अचानक परिपत्रक काढल्याने शहरातील महिला भगिनींची पाणी साठवणुकीसाठी मोठी धावपळ व तारांबळ झाली असल्याने शहरातील महिलांची पाण्यासाठी नगरपालिकेकडून ससेहोलपट होत असल्याची खंतही श्री.पाटील यांनी व्यक्त केली आहे.
सध्या ५ नंबर नवीन साठवण तलावाचे येसगाव येथे काम चालू असून, त्याच्या चारही बाजूला काँक्रीटच्या भिंती उभारण्यात आल्या.परंतु या तळ्याच्या तळात माती व प्लास्टिकच्या कागद अस्तरीकरणासाठी टाकला आहे. शासनाने शहराचे पाणी योजनेसाठी १३१ कोटी रुपये मंजूर केले होते. हे पैसे नागरिक जे कर भरतात व पट्टी भरतात यातूनच खरे शासन हे नागरिकांच्या सोयीसाठी हे पैसे देत असतात.यामुळे जनतेवर उपकार केले असे होत नाही. हे शासनाचे कर्तव्यच आहे,खरे तर शासनाकडे निधी मागण्यासाठी आपली नगरपालिका कमी पडली म्हणून आजपर्यंत शहरास पाण्यासाठी माता-भगिनींना,मुलांना नागरिकांना कधी कधी तर महिन्यातून एकदाच पाणी मिळाले असे अनेक वर्ष त्रास हा नागरिकांना केवळ जागा असताना सुद्धा तळे होण्यासाठी प्रयत्न न केल्यामुळे वर्षानुवर्षे सहन करावा लागला असल्याचेही वेदनादायी चित्र पहावयास मिळत असल्याने जीव कासावीस होत आहे असेही श्री.पाटील यांनी म्हटले आहे.
कोपरगाव शहराची लोकसंख्या ही दिवसेंदिवस वाढत आहे.शहराच्या हद्दीमध्ये लगत असलेले छोटे छोटे भाग हे जोडले गेलेले आहेत.त्यामुळे पाण्याची मागणी वाढत चाललेली आहे.त्यामुळे या तळ्याच्या तळ्यात काँक्रिटीकरणच व्हायला पाहिजे होते असेही श्री.मंगेश पाटील यांनी आवर्जुन म्हटले आहे.असे न झाल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याच्या तळ्यातील पाणी भरल्यानंतर दाब आल्यावर चार चार,पाच पाच किलोमीटर पर्यंत पाणी पाझरून जाणार आहे आणि तळे लवकरात लवकर रिकामे होणार यात शंका नाही. त्यासाठी तळ्याच्या तळाला काँक्रिटचं हवं आहे.
त्याचबरोबर नाशिक भागातील ज्या धरणांमधून आपल्याला पाणी येतं तिथे मोठ्या प्रमाणात शहरांची वाढत झपाट्याने होत असल्यामुळे पिण्याच्या पाण्यासाठी आरक्षण पडत आहे व आपले पाणी हे कमी होत चालले आहे अशीही खंत श्री. पाटील यांनी व्यक्त केली आहे.धरणातील पाण्यावर आरक्षण पडल्यामुळे शेतीसाठी मिळणाऱ्या पाण्याचे रोटेशन लांबत चालले आहे.त्यामुळे आपल्याला तळ्यात पाणी मिळण्यासाठी उशीर होणार आहे आणि पाणी पर्कुलेट झाल्यामुळे पाणीसाठा कमी होणार आणि शहरवासीयांना हे तळे जरी पूर्ण झाली तरी इथून पुढच्या भविष्याच्या ५,१०,१५ दिवसा आड आणि तेही गढूळ व अस्वच्छ पाणी मिळत राहणार यासाठी नगरपालिकेने अजूनही सप्लीमेंट्री काँक्रिटीकरणाच्या निधीसाठी शासन दरबारी तात्काळ प्रयत्न करून तो मिळवावा व काँक्रिटीकरण जनतेच्या हितासाठी करावे आणि ते करणे आत्ताच शक्य आहे असे मत त्यांनी व्यक्त केली.अन्यथा भविष्यात परत काँक्रिटीकरण होऊ शकणार नाही व जनतेचे असेच हाल वर्षानुवर्ष होत राहणार असे श्री पाटील यांनी म्हटले आहे.
काँक्रिटीकरण केल्यामुळे पाणी स्वच्छ राहील तळे धुता येईल स्वच्छ करता येईल ठेवता येईल.असे न झाल्यास याचा कोपरगाव शहराच्या वाढीवर, विकासावर आणि व्यापारावर निश्चित विपरीत परिणाम होणार आहे.तरी अजूनही वेळ गेलेली नाही नगरपालिकेने शासन दरबारी प्रयत्न करून तळ्याच्या तळामध्ये काँक्रिटीकरणाचे अस्तरीकरण करावे अशी मागणी माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी नगरपालिकेला शेवटी केली आहे.