

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर
कोपरगाव : कोपरगाव शहरातील बस स्टँन्ड मधील सुलभ शौचालय ग्रामीण भागातील महिला व शाळेच्या मुलींसाठी पैसे न घेता मोफत करावे तसेच सुलभ शौचालय उभारून स्वच्छ ठेवण्याचे व निशुल्क देणे ही जबाबदारी बस डिपार्टमेंटची आहे. ते निशुल्क करावं त्याचबरोबर बस स्टँडचे ये- जा करण्यासाठी असलेले मुख्य प्रवेशद्वाराचे खड्डे तातडीने बुजवावे अशी मागणी विभाग नियंत्रक मनीषा सपकाळ मॅडम तक्रार निवारणासाठी आल्या असतांना माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी समक्ष भेटून दिली असल्याची माहिती आपल्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.

यावेळी विभागीय वाहतूक अधिकारी कमलेश धनराळे,यांत्रिकी प्रमुख पंडित,आगार प्रमुख अमोल बनकर, स्थानिक प्रमुख योगेश दिघे,सहाय्यक वाहतूक निरीक्षक नाना आहेर यांचेसह नागरिक उपस्थित होते.
आपल्या प्रसिध्दी पत्रकात श्री.पाटील म्हणाले कि,कोपरगाव शहरात ग्रामीण भागातून शालेय शिक्षणासाठी,कॉलेज साठी मुली तसेच शेतकरी महिला व नागरिक मोठ्या संख्येने तालुक्याच्या ठिकाणी रोज ये जा करत असतात. ग्रामीण भागातील सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांच्या दृष्टीने कोपरगाव शहरात कामानिमित्त ये-जा कण्यासाठी बस हे एकमेव परवडणारे साधन असल्याने महिला वर्गासह नागरिकांची मोठया प्रमाणात बस स्टँड परिसरात वर्दळ असते.
परंतु,दुर्दैवाची गोष्ट अशी की बस स्टॅन्ड मध्ये आत येताना व बाहेर जाताना जे दोन मुख्य प्रवेशद्वार आहेत तिथे मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून पावसामुळे तेथे पाणी साचले आहे व ते मुला मुलींच्या नागरिकांच्या एसटी बस व वाहन गेले की अंगावर उडत असते या साचलेल्या पाण्यामुळे शाळेच्या मुले -मुली,जेष्ठांसह नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐैरणीवर आला आहे. बस स्टँडमध्ये जातांना व बाहेर पडतांना प्रवाशांसह सर्वांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. बहुतांश वेळा पाण्याने भरलेल्या खड्यांचा अंदाज न आल्याने नागरिक या खडयांमध्ये पडतात सुद्धा. हे खड्डे तातडीने बुजवावे व बस स्टॅन्ड मधील सुलभ शौचालयात पैसे आकारले जातात, घेतले जातात ते ह्या मुलींना नागरिकांना महिलांना परवडणारे नाही.बस स्थानकाची सुलभ शौचालय उभारून ते स्वच्छ ठेवणे व निशुल्क देणे ही जबाबदारी बस डिपार्टमेंट ची आहे असेही माजी.नगराध्यक्ष मंगेश पाटील म्हणाले.
मुख्य प्रवेशद्वारा मधील आत व बाहेर जाणाऱ्या रस्त्यात पडलेल्या मोठ्या खड्ड्यांबाबत बोलताना अधिकारी म्हणाले कि, ती हद्द नगरपालिकेची आहे.आम्ही वेळोवेळी नगरपालिकेला कळविले परंतु अद्यापपर्यंत नगरपालिकेने याकडे दुर्लक्ष केले आहे, हे काम नगरपालिका आणि बस स्टँडच्या जागेच्या हक्काच्या वादात नागरिकांची हाल होत आहे. तरी नगरपालिकेने तातडीने निर्णय घेऊन खडी करण करून त्यावर तात्काळ डांबरीकरण किंवा काँक्रिटीकरण करून द्यावे किंवा बस डिपार्टमेंटने बुजवावे शाळेच्या मुला मुलींना नागरिकांना होणाऱ्या त्रासापासून मुक्त करावे. यावेळी विभाग नियंत्रक सपकाळ मॅडम यांनी तातडीने शौचालय बाबतीत व खड्डे बुजवण्याबाबत संबंधितांना सांगितले.
असे लवकर न झाल्यास शौचालयासाठी पाच रुपयापर्यंत पैसे मागतात हे बंधन झाल्यास शाळकरी कॉलेजला बसने प्रवास करणाऱ्या मुलींना व ग्रामीण भागातील महिला भगिनींना बस स्टॅंडवर सर्व बस गाड्या थांबून आंदोलन करावे लागेल असा इशारा श्री पाटील यांनी यावेळी संबधितांना दिला आहे.
तसेच कोपरगाव शहरात महिलांसाठी स्वच्छतागृह नसल्यामुळे व बस स्टॅन्ड येथे पैसे मागत असल्याने महिला वर्गाची मोठी गैरसोय होत असून नगरपालिकेने व बस डिपार्टमेंटने वाद बाजूला ठेवून प्रवाशी नागरिकांच्या आरोग्याचा विचार डोळ्यासमोर लवकरात लवकर निर्णय घ्यावा असेही शेवटी माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी विनंती केली आहे.