Homeकोपरगावआपले गाव आपली जबाबदारी उपक्रमा अंतर्गत नव युवकांनी उचलला गाव स्वच्छतेचा विडा

आपले गाव आपली जबाबदारी उपक्रमा अंतर्गत नव युवकांनी उचलला गाव स्वच्छतेचा विडा

“आपले गाव आपली जबाबदारी “

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – तालुक्यातील कुंभारी येथील युवा पिढीने आपले गाव आपली जबाबदारी या उपक्रमाअंतर्गत कुंभारी गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याचा एक प्रकारचा विडा उचलला आहे यामध्ये अनेक तरूण युवक दर रविवारी सकाळी सहा वाजेपासून ते नऊ वाजेपर्यंत कधी मंदिर परिसर,घाट परिसर, स्मशानभूमी परिसर,प्राथमिक शाळा,माध्यमिक विद्यालय,आरोग्य उपकेंद्र, गोदावरी नदी परिसर,बस स्टॉप,गाव अंतर्गत रस्ते तर कधी शिवार वाहतूक रस्ते अशा अनेक सार्वजनिक ठिकाणी आपली स्वच्छता मोहीम गेल्या ४१ आठवडयापासून राबवून १० ते १५ नवयुवक गाव स्वच्छ व सुंदर बनवण्यासाठी आपले योगदान सातत्याने देत आहे.

त्यांच्या योगदानाचे फलित म्हणून या नव युवकांनी ज्या ज्या ठिकाणी आपली स्वच्छता मोहीम राबविलेली असेल त्या त्या परिसरात राहत असलेल्या लोकांनी स्वच्छ केलेला परिसर अधिक स्वच्छ व सुंदर कसा ठेवता येईल याबाबत जनजागृती करावी व या मोहीमेमध्ये अनेकांनी अधिकाधिक सहभाग घेऊन आपला परिसर स्वच्छ व सुंदर बनविण्यास मदत करावी एवढीच माफक अपेक्षा या नव युवकांच्या वतीने करण्यात येत आहे.

या नव युवकांच्या उपक्रमाचे पंचक्रोशितून कौतुक तर होतच आहे त्यांचबरोबर त्यांना प्रोत्साहन देण्याचे काम सुज्ञ गावकरी मंडळी करत असल्याने या टिमचा उत्साह वाढण्यास भर पडत आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!