Homeकोपरगावनागरिकांनी…. या खात्याच्या अतुलनीय योजनांचा लाभ घ्यावा - राजेश नेतनकर

नागरिकांनी…. या खात्याच्या अतुलनीय योजनांचा लाभ घ्यावा – राजेश नेतनकर

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – येथील पोस्ट ऑफिस कार्यालयात श्रीराम जन्मभूमी मंदिर प्रतिकृती व स्टॅम्प असलेली ऍक्रेलिक फ्रेम नागरिकांसाठी विक्रीसाठी उपलब्ध करून देण्यात आली असून त्याची किंमत 500 रुपये आहे इच्छुकांनी कोपरगाव पोस्ट ऑफिस कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन पोष्टमास्तर राजेश नेतनकर यांनी केले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी डिजिटल इंडिया अंतर्गत विविध सेवांचे आधुनिकीकरण करत त्यात पोस्ट कार्यालयाचा अंतर्भाव करत वेगाने बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी असणाऱ्या सेवा सुविधा जनसामान्यांपर्यंत उपलब्ध करून देण्याचा विडा उचलला आहे.डिजिटलयुगात बहिणींकडून आपल्या लाडक्या भावास राखी पाठविण्यासाठी टपाल विभागास अनेकांची पसंती आहे.यासाठी टपाल विभागाच्यावतीने दूरवर असलेल्या लाडक्या भावास राखी पाठविण्यासाठी विशेष पाकिटे तयार करण्यात

आली आहेत.या पाकिटांमुळे लाडक्या भावास वेळेत व जलदगतीने राखी मिळणार आहे.एका पाकिटाची किंमत १२ रुपये आहे. या पाकिटासाठी दर्जेदार कागद वापरला आहे.डिजिटल शुभेच्छांच्या युगात प्रत्यक्ष मिळालेली राखी आणि तीही विश्वासार्ह टपाल विभागाकडून म्हणून तिचे महत्त्व जास्त आहे. जी राखी बहिणीने मोठ्या प्रेमाने खरेदी केली,ती तितक्याच काळजीपूर्वक टपाल विभागाच्या राखी पाकिटामधून पाठविली जाणार आहे. दर वर्षी या राखी पाकिटांना प्रचंड मागणी आहे.परदेशातही राखी अतिशय जलद आणि वेळेवर पोहोचू शकेल.ग्राहक त्यांच्या राखी ‘स्पीड पोस्टा ‘ने देशात तसेच प्रदेशातही त्या पाठवू शकतील.सर्व नागरिकांनी टपाल खात्याच्या या अतुलनीय योजनांचा लाभ घ्यावा,असे आवाहन पोस्ट मास्तर राजेश नेतनकर यांनी केले आहे.लाडकी बहीण योजना पोस्ट कार्यालयात सुरू असून प्रत्येक महिलेला आधार कार्ड,पॅन कार्ड, दोन फोटो व रुपये दोनशे मध्ये हे खाते सकाळी आठ ते एक वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत काढून देण्यात येईल,पॅन कार्ड नसलेल्या बहिणीला आय.पी.पी.बी मधून खाते उघडून देण्यात येईल.पोस्ट कार्यालयाने प्रत्येकाला पंधरा लाखांचा अपघाती विमा केवळ 755 रुपयात एक वर्ष मुदतीचा उपलब्ध करून दिला आहे, त्यासाठीही इच्छुकांनी संपर्क साधावा, तसेच देशासह परदेशातही राखीचे पार्सल पाठवण्याची सुविधा, तसेच 35 किलो वजनाचे पर्यंतचे पार्सल परदेशात पाठवण्याची सुविधा येथील पोस्ट कार्यालयात डाक अधीक्षक हेमंत खडकीकर,डाक निरीक्षक अनंत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपलब्ध करून देण्यात आली आहे असे राजेश नेतनकर शेवटी म्हणाले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!