Homeकोपरगावनगरपालिकेने नवीन ५ नंबर साठवन तळ्याचा निघालेला मुरूम,खडक ; भाजीपाला लिलाव,मौंढा,बैल बाजार,...

नगरपालिकेने नवीन ५ नंबर साठवन तळ्याचा निघालेला मुरूम,खडक ; भाजीपाला लिलाव,मौंढा,बैल बाजार, चमडा मार्केट येथे टाकला असता तर शेतकऱ्याची हाल झाली नसती – माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : – कोपरगाव कृषी उत्पन्न बाजार समिती नगरपालिकेसाठी मोठ्या प्रमाणात कर स्वरुपी उत्पन्नाचे साधन आहे. त्या बदल्यात नगरपालिकेने शहराचा विकास विचारात घेऊन मार्केट कमिटीला स्वतःहून कामाच्या रूपात सहकार्य केलं पाहिजे असे मत माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकाद्वारे मांडले आहे.

शहरामध्ये बैल बाजार रोडला दर सोमवारी जनावरांचा मोठा बाजार भरतो त्यात गाई,म्हशी,बैल मोठ्या प्रमाणात खरेदी विक्रीसाठी शेतकरी घेऊन येतात.तसेच चमडा लिलाव मोठ्या प्रमाणात भरत असतो. त्याचप्रमाणे आठवडाभर दररोज ग्रामीण भागातील शेतकरी भाजीपाला घेऊन लिलावासाठी पहाटे येतात, त्याचाही लिलाव बैल बाजार रोड जवळील खंदकनाल्यालगत जागेत होत असतो.परंतु,पावसाळ्यात मात्र सदर ठिकाणी मोठ्या प्रमाणात चिखल होतो,पाणी साचते,किडे,माशांची उत्पत्ती होऊन दुर्गंधी वाढते यामुळे साथीच्या आजारांना बळ मिळत असल्याची चिंता श्री. पाटील यांनी व्यक्त केली.अशा चिखलमय ठिकाणी जनता खात असलेल्या भाजीपाल्याचा लिलाव भरत असतो.

पुढे श्री.पाटील यांनी म्हटले कि, आठवड्यातून एकदा बैल बाजार व चमडे बाजार भरतो. या ठिकाणी घेणारे टेम्पो,गाडया चिखलात फसतात जनावरे पडतात,त्यांना इजा होते, जनावरे आत- बाहेर ने -आणं करतांना व्यापाऱ्यांसह,टेम्पो व गाडयावाल्यांचे खूप हाल होतात.तरी नगरपालिकेने सहकारी शासकीय संलग्न संस्था या नात्याने व कोपरगाव शहरांमध्ये व्यापारी या लिलावासाठी मोठ्या प्रमाणात येत असल्याने छोटे- मोठे दुकाने रिक्षा,टेम्पो वाले यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक दृष्ट्या व्यवहार होतो,चलन फिरतात.हे सर्व विचारात घेऊन पाच नंबरचे येसगाव येथील साठवण तळ्यातील मुरूम मोठे दगड हे जर नगरपालिकेने मार्केट कमिटीला फ्री मध्ये किंवा आगदी नाममात्र दरात टाकून दिले असते,तर निश्चितपणे शहरातील व्यापारी रिक्षावाले शेतकरी यांचे व जनावरांचे हाल झाले नसते.

अजूनही दुसऱ्या चार नंबर तळ्याचे काम चालू होणार आहे,त्या तळ्यातील मुरूम गोटे हे नगरपालिकेने मार्केट कमिटी यांच्याशी चर्चा करून जनावरांचा बाजार,रोजच्या भाजीपाला लिलावाची जागा,चामडा मार्केट येथे टाकता येऊ शकते.जेणेकरून शेतकरी, व्यापारी,टेम्पो, ट्रॅक्टर, रिक्षा वाले यांचा होणारा त्रास कमी होईल असे नगरपालिका प्रशासनास श्री. पाटील यांनी सुचविले असून त्यांनी यावर गांभीर्याने विचार करून अमलबजावणी करावी.

जसे गोदावरी नदीवरील जुन्या काळातला मोठा पूल पाडला गेला. त्याचे सर्व दगड जर नगरपालिका प्रशासनाने गोळा करून त्या दगडांमध्ये श्री स्वामी समर्थ मंदिरालगत खेटून दगडाचा पुरातन काळातील दिसणारा असा जनतेला उपयोगी नवीन घाट नदीपात्राच्या दोन्ही बाजूला तयार झाला असता.त्याचे लाखो रुपये किमतीच्या दगडांची काय विल्हेवाट लावली याची चौकशी होणे गरजेचे आहे.तसेच पाच नंबर तळ्याच्या मुरमाच्या बाबत टेंडर मध्ये काय होते व टेंडर मध्ये जरी काही उणीव असली तरी नगरपालिका त्यात मार्ग काढू शकते असेही म्हटले आहे.

आधीच नगरपालिकेने शासनाच्या मार्फत २०११ साली छोटे-मोठे दुकानदार टपरीधारक यांना उठवून मोठा अन्याय टपरी धारकांवर व शहराच्या व्यापारावर केला होता.
त्यातच टाकळी फाटा येथील बीजगुणन केंद्र येथे संपूर्ण मार्केट कमिटी,धान्य लिलाव,कांदा मार्केट, जनावरे बाजार,चमडी बाजार हलवायची चर्चा सध्या दबक्या आवाजात शहरात होत आहे.असे जर झाले तर मार्केट कमिटी जवळील, येवला रोड येथील सर्व दुकाने ओस पडतील.यात हॉटेल वाले ,गाड्या रिपेअर करणारे,अवजारे वाले,शेती उपयोगी पेस्टिसाइड,बी -बीयानांची सर्व दुकाने,स्टील, सिमेंट,लाकडी दरवाजे, रासायनिक खतांचे दुकाने सर्व ओस पडतील.त्याचबरोबर मालवाहू,रिक्षावाले,टेम्पोवाले यांचे धंदे बुडले जातील.आणि असे जर मार्केट कमिटीच्या विचाराधीन असेल तर निश्चितपणे शहरातील जनतेचा विचार घेऊनच असा काही निर्णय घ्यावा.जर असे काही विचारात नसेल तर जनतेला याबाबत आनंदच आहे. म्हणून शहरातच हे सर्व राहो यासाठी नगरपालिकेने गाव कसं वाढेल, सहकारी संलग्न शासकीय संस्था, जवळच्या संस्था यांना कशाप्रकारे चांगले काम करून मदत करता येईल याचा विचार इथून पुढे तरी स्वतःहून जनतेसाठी गावाच्या विकासासाठी चलनवाढीसाठी नगरपालिकेने करावा. कृषी उत्पन्न बाजार समिती मार्केट कमिटीचे व्यवस्थापक व सर्व संचालक मंडळ आल्यापासून शेतकऱ्यांचे हिताचे, बैल बाजार येथे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये यासाठी चांगले काम ते करत आहेत.तसेच शहरातील प्रत्येक सोमवारी बाजारतळ येथे भरणारा सोमवारच्या दिवशीचां बाजार भाजीपाला फळवाले विक्रेते यांना चिखलाचा त्रास होऊ नये यासाठी काय करता येईल याची उपायोजना नगरपालिकेने करावी. जेणेकरून नागरिकांबरोबर विक्रेत्यांनाही त्रास होणार नाही याची काळजी नगर पालिका प्रशासनाने ध्यावी असेही शेवटी माजी. नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी म्हटले आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!