HomeUncategorizedश्री गणेश कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

श्री गणेश कारखाना वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न

गणेश कारखान्यात बदल का झाला कधीच विसरू नका – बाळासाहेब थोरात

कारखाना हिताच्या आड येणाऱ्यांना येत्या निवडणुकीत जनता धडा शिकवेल – विवेकभैय्या कोल्हे

मुख्य संपादक -राजेंद्र तासकर

कोपरगाव : श्री गणेश सहकारी साखर कारखाना ६३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. माजी महसूलमंत्री आ.बाळासाहेब थोरात,जिल्हा बँकेचे संचालक युवानेते विवेकभैय्या कोल्हे, प्रभावतीताई घोगरे,चेअरमन सुधीर लहारे, व्हा.चेअरमन विजय दंडवते व सर्व आजी माजी संचालक मंडळ, लताताई डांगे,सुधीर म्हस्के,गंगाधर चौधरी, शिवाजी लहारे,चंद्रभान गुंजाळ, नानासाहेब गव्हाणे,चंद्रभान धनवटे, सर्जेराव जाधव,बलराज धनवटे,महेंद्र शेळके,रामचंद्र बोठे, उत्तम मते,भाऊसाहेब थेटे,संजय सरोदे,डॉ.वसंत लबडे,उत्तमराव घोरपडे, प्रकाश मोठे,अविनाश दंडवते, विक्रांत दंडवते आदींसह अधिकारी,सभासद, शेतकरी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.गणेश सहकारी साखर कारखाना अनेक अडचणीतून मात करून पुढे जात आहे. आर्थिक घडी बसविताना संजीवनी आणि संगमनेर यांची मदत असेलच, त्यामुळे येणाऱ्या हंगामात गतवर्षी पेक्षा अधिक चांगले गाळप करण्यात कारखाना यशस्वी होईल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

या प्रसंगी बोलताना बाळासाहेब थोरात म्हणाले आम्ही चांगले करण्यासाठी आलो आहोत.या भागात असणारे पाण्याचे आणि जनजीवनाशी निगडित समस्या सोडवण्यासाठी जे शक्य असेल प्रयत्न आमचे आहेत.राजकीय विरोधक कितीही अडथळे आणत असतील तरी कारखाना यशस्वी आपण चालवून दाखवला या पुढे देखील ताकतीने चालवू.शेतकऱ्यांनी ऊस जास्त कसा वाढेल कारखान्यासाठी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. माझ्यावर समन्यायीचा आरोप करणारे तेव्हा कुठे होते ? मंत्रिमंडळात तुम्ही होतात मग का नाही बोललात ? या उलट संगमनेर मधून आम्ही भूमिका घेतली समन्यायी बद्दल विरोध दर्शविला होता.महसूलमंत्री असताना आम्ही खोट्या केसेस करून लोकांना जेल मधे टाकले नाही तर जे सत्य असेल तेच काम केले.सद्या मात्र इकडे विरोधात बोलला की खोटे गुन्हे दाखल करून त्रास दिला जातो हे चित्र आहे.गणेश कारखाना इतिहास का घडला हे विसरू नका कारण जर आपण ते विसरलो तर पुन्हा सगळं जैसे थे होईल आणि निवडणुकीच्या तोंडावर एम आय डी सी सारख्या तात्पुरत्या वल्गना हे करतील.खर तर मुळात शिर्डीचे रुग्णालय का कमी पडले याचा अभ्यास केला तर विरोधकांचे खरे कारनामे उघड होतीस अशा रोख साधत बाळासाहेब थोरात यांनी विरोधकांचा समाचार घेतला. तसेच मागील हंगामात कारखाना सुरळीत चालला कारण सर्वांनी जिद्द दाखवली त्याबद्दल विवेकभैय्या आणि संचालक मंडळ यांचे कौतुक त्यांनी केले.

विवेकभैय्या कोल्हे यांनी गणेश कारखान्याचे जुने साहित्य पूर्वीच्या काळात कसे विकले गेले असे दाखवले याची चौकशी करण्यासाठी तक्रार केलेली आहे.कारखाना जिल्ह्यात सर्वोत्तम चालावा यासाठी प्रयत्नशील आहे.ऊस वाढीसाठी सभासदांनी मोहीम हातात घेऊन जास्तीत जास्त ऊस वाढवला पाहिजे. जिल्ह्यात सर्वाधिक साखर उतारा घेणारा कारखाना आपण करून दाखवला कारण सर्वांची जिद्द होती. मागील कालखंडात काय राजकारण झाले हे सर्वांना ठाऊक आहे कसे कसे अडचणी निर्माण केल्या गेल्या हे सर्वांना ज्ञात आहे.संस्था नफ्यात येण्यासाठी आपली सामूहिक शक्ती महत्वाची आहे.गणेश परिसातील बंधारे काही भरले आहेत मात्र काही अद्याप भरणे बाकी आहे त्यानुसार येत्या काळात त्याकडे देखील आपले लक्ष असणार आहे.कारखाना चांगला चालला पाहिजे यासाठी विविध माध्यमातून सहाय्य उभे करण्याचा प्रयत्न असतो त्यासाठी राजकीय पाठबळ गरजेचे असते कारण त्याशिवाय अनेक अडचणी येतात. यापुढे जो गणेश कारखाना हिताच्या आड येईल त्याला येत्या निवडणुकीत धडा जनता शिकवेल असा इशारा देखील कोल्हे यांनी दिला आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!