
कोपरगाव : – नुकताच 23 जून ला आंतरराष्ट्रीय एकल महिला दिनाचे आयोजन सावित्रीबाई फुले ज्ञानदीप प्रतिष्ठान तर्फे माळी बोर्डिंग येथे करण्यात आले. त्यानिमित्त महात्मा फुले यांचे 200 वी जयंती वर्ष नगरपालिका महानगरपालिका ग्रामपंचायत साजरे केले जात आहे. महात्मा फुले यांचे विधवा व समस्त महिलांसाठी फार मोठे योगदान आहे. त्यांनी महिलांसाठी काय काम केले याचे स्मरण होण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले.


तालुक्यातील एकल महिलांची संख्या 11000 च्या आसपास आहेत. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी नगराध्यक्ष पद्मकांत कुदळे होते. एकल महिलांच्या हातून प्रतिमा पूजन करून प्रास्ताविकातून सावित्रीबाई फुले प्रतिष्ठानच्या अध्यक्षा संगीता मालकर यांनी संस्थेचा आढावा घेतला. प्रमुख उपस्थिती कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांनी व्यासपीठावरून महिलांशी संवाद साधताना म्हणाले की, भावनांना व स्वप्नांना हातभार लावण्याचा कार्यक्रम आहे. जन पळभर म्हणतील हाय हाय. एकटेच आलो आणि एकटेच जाणार आहोत बाकी सर्व आभासी आहे. एकल महिला ही परिस्थितीनुसार आहे. प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही प्रसंग वादळ येतात त्या कठीण प्रसंगाला सामोरे जाऊन देखील खंबीरपणे ज्या महिला उभ्या राहतात कुटुंबाची जबाबदारी घेतात. खऱ्या अर्थाने आई आणि वडिलांची भूमिका त्या निभावतात चांगल्या विचारांच्या वाटपासोबतच त्या विचारांची पेरणी होणे अत्यंत गरजेचे आहे. शासन खंबीरपणे महिलांच्या पाठीशी उभे आहे. विविध शासकीय योजनांचा लाभ महिलांना देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. त्यावेळी गवंडी काम करणाऱ्या एकल महिला सुनिता निकम व त्यांची मुलगी अकरावी मध्ये प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याबद्दल तहसीलदारांच्या हातून मायलेकींचा सन्मान करण्यात आला.

पद्मकांत कुदळे म्हणाले की, आजचा हा कार्यक्रम अत्यंत हृदयस्पर्शी व भावनिक आहे खऱ्या अर्थाने सावित्रीबाई फुले प्रतिष्ठान हे या महिलांचे माहेरघर आहे. ज्योती पतसंस्थेचे चेअरमन रवी काका बोरावके म्हणाले की, या महिलांसाठी आम्ही मदतीसाठी सदैव तत्पर आहोत. महात्मा फुले मंडळाचे कार्याध्यक्ष प्रदीप नवले यांनी देखील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत दिली.
यावेळी व्यासपीठावर उपस्थित माळी बोर्डिंग चे अध्यक्ष बाळासाहेब पांढरे अनिल शेवते आबासाहेब गिरमे घारमाळकर साहेब दिलीप ससाणे तात्यासाहेब रासकर बाबासाहेब मालकर राहुल बनकर आदी मान्यवर उपस्थित होते त्याचप्रमाणे पंचायत समितीचे संरक्षण अधिकारी बाबासाहेब गोरडे यांनी बाल संगोपन योजना आधार सिडींग फार्मचे रिन्यूअल बाबत महिलांना मार्गदर्शन केले. त्यावेळी महिला बालकल्याण विभागाच्या सीडीपीओ धुमाळ मॅडम विखे सर उपस्थित होते.
या कार्यक्रमाला लिओ क्लबच्या सोनाली गिरमे, सावित्री भिशी ग्रुप च्या माधवी टिळेकर, वर्षा झवर, शिंदे मॅडम, गीताताई रासकर, छायाताई व गिरमे परिवार, सुनिता ससाने, स्मिता पोळ, नंदिनी पाटील, स्वाती घुगे, जयश्रीताई बोरावके, महात्मा फुले पतसंस्थेचे हरिभाऊ गिरमे या सर्वांच्या मदतीतून 260 डझन वह्यांचे वाटप विद्यार्थ्यांना करण्यात आले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार सुनिता ससाने यांनी मानले