
राज्य पत्रकार संघटनेच्या कोपरगाव तालुक्याच्या वतीने अंगणवाडी सेविकाचा सन्मान
कोपरगाव :– कोपरगाव येथील अंगणवाडी सेविकांचा सन्मान राज्यासाठीच नाही तर देशासाठी प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस मा.श्री.डॉ. विश्वासराव आरोटे यांनी केले आहे.

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून राज्य पत्रकार संघटना कोपरगाव शाखेच्या वतीने कौटुंबिक जबाबदारी सांभाळून नेहमी सामाजिक कार्यात अग्रेसर असणाऱ्या तालुक्यातील अंगणवाडी सेविका व मदतनिस महिलांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सन्मानपत्र व सन्मानचिन्ह देउन दि. ८ मार्च रोजी कोपरगाव पंचायत समिती कार्यालय हॉलमध्ये मोठया दिमाखात संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते.
राज्य पत्रकार संघाच्या कोपरगाव शाखेच्या वतीने महिला दिनी अंगणवाडी सेविकांचा केलेला सन्मान सोहळा हा नक्कीच राज्यासाठी रोल मॉडेल ठरणार असून भविष्यात संघटनेच्या वतीने सर्वच तालुक्यातील अंगणवाडी सेविकाचा भव्य दिव्य सन्मान सोहळा करण्यात येईल – डॉ विश्वासराव आरोटे,प्रदेश सरचिटणीस राज्य पत्रकार संघ

यावेळी प्रमुख अतिथी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे प्रदेश सचिव मा श्री डॉ विश्वासराव आरोटे साहेब,संजीवनी इग्लिश मिडीयम स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी मा.सौ.रेणुकाताई विवेक कोल्हे, कोपरगाव निवासी नायब तहसिलदार मा.सौ. प्रफुल्लिता सातपुते, भागवताचार्य ह.भ.प. कविताताई साबळे, कोपरगाव ग्रामीण पोलिस उपनिरिक्षक मा.सौ. वैशाली मुकणे, मा. सौ. रुपाली धुमाळ महिला व बालविकास अधिकारी, पशुधन विकास अधिकारी मा.सौ. श्रध्दा काटे, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे आदि मान्यवर यांसह अंगणवाडी सेविका व मदतनिस महिला भगिनी मोठया संख्येने उपस्थित होत्या.

उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दिप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात झाली.
अध्यक्षीय भाषणात मा. डॉ.आरोटे पुढे बोलताना म्हणाले की, पत्रकाराकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोन हा वेगळा असतो परंतु पत्रकार हा एक समाजसेवकच आहे .गेली वीस- पंचवीस वर्षे पत्रकार क्षेत्रात काम करीत असताना अनेक सामाजिक उपक्रम आम्ही घेतले आहेत. अंगणवाडी सेविकांचा सन्मान करणे महत्त्वाचा उपक्रम असून आमच्यासाठी तो एक आदर्श आहे. ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांना पत्रकार आठवत असतो. आमचे पत्रकार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के पत्रकारिता करतात. अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचा सन्मान करण्याचा योग येणं हे आमचे भाग्य आहे. कोपरगावच्या पत्रकार संघाच्या वतीने सेवकांचा सन्मान हा राज्यासाठीच नाही तर देशासाठी एक आदर्श ठरेल असे सांगत पत्रकार संघटनेच्या तालुका पदाधिकाऱ्याचे कौतुक केले.

संजीवनी इंग्लिश मिडीयम स्कूलच्या मॅनेजिंग ट्रस्टी रेणुका कोल्हे यांनी बोलताना सांगितले की, प्रत्येक महिला रोज आपल्या अस्तित्वाची लढाई लढत असतात. या समाजात महिला म्हणून राहणे सोपे नाही . समाजात आपल्याला टिकून राहायचे आहे. घरदार सांभाळून स्वतःची ओळख निर्माण करायची आहे. पत्रकारांमध्ये फार मोठी शक्ती आहे म्हणून दिवसेंदिवस वाढत चाललेल्या महिलांवरील अत्याचारांच्या विरोधात कडक कायदे करण्यासाठी शासनाला पत्रकारांनी भाग पाडावे असे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थित पत्रकारांना केले.

भागवताचार्य कविताताई साबळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपणच आपल्या घराच्या गृहमंत्री, अर्थमंत्री, दूरसंचारमंत्री ,पालकमंत्री आहोत. आपणच आपले कुटुंब सांभाळलं पाहिजे. सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला स्वातंत्र्य दिले परंतु त्याचा स्वैराचार करता कामा नये. कायदा महिलांच्या बाजूने आहे त्याचा दुरुपयोग होता कामा नये. नाती जोडणे नाती जोपासणे नाती बांधून ठेवणे हे आपल्या महिलांचेच काम आहे. अन्याय अत्याचार विरुद्ध आपण स्वतः लढायला शिकलं पाहिजे असेही आवाहन त्यांनी केले तर निवासी नायब तहसीलदार सातपुते, पोलीस उपनिरीक्षक मुकणे, पशुधन अधिकारी डॉ काटे यांनी देखील वेगवेगळे दाखले देत महिलांच्या शौर्याचे कौतुक करत सर्वाना शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघटनेचे कोपरगाव तालुकाध्यक्ष मा.जनार्दन जगताप सर, ता.उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, ता कार्याध्यक्ष किरण ठाकरे, ता. सचिव विजय कापसे, शहराध्यक्ष हाफिस शेख, उपशहराध्यक्ष स्वप्निल कोपरे, शहर कार्याध्यक्ष बिपीनराव गायकवाड, प्रसिद्धी प्रमुख किसनराव पवार, सहसचिव सोमनाथ डफाळ, सदस्य फकिरा टेके, विनोद जवरे, मधुकर वक्ते, राजेंद्र तासकर, राहुल कोळगे, संजय लाड, गोविंद वाकचौरे, रवि वाघडकर,अमोल गायकवाड, गणेश बत्तासे,संदिप विदुर, काकासाहेब खर्डे, दिनेश जोशी,अक्षय काळे आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसह अंगणवाडी पर्यवेक्षिका यांनी अथक परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक तालुकाध्यक्ष जनार्दन जगताप सर यांनी तर सुत्रसंचालन संघटनेचे सचिव प्रा. विजय कापसे सर व अंगणवाडी पर्यवेक्षिका उमा खोल यांनी केले व शेवटी उपस्थित मान्यवरांचे व पत्रकार संघटनेचे आभार महिला व बाल विकास अधिकारी रुपाली धुमाळ यांनी मानले.