
कोपरगाव ता.२४ : – कोपरगाव तालुक्यातील कृषीपंढरीचे वारकरी, सहकाराचे महामेरू व शेतकऱ्यांचे कैवारी आणि गोरगरिबांचे भाग्य विधाते माजी सहकार मंत्री स्व. शंकररावजी कोल्हे साहेब यांच्या (२४ मार्च) पूण्यस्मरणानिमित्त कुंभारी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणात कार्यकर्ते व ग्रामस्थांच्या वतीने प्रतिमेस पूष्पहार अर्पण करुन प्रेरणा दिन म्हणून साजरा करण्यात आला .

त्याचबरोबर शाळेतील मुलामुलींना बिस्कीट वाटप केले व शाळेसाठी साउंड सिस्टिम घेणेकामी देणगी स्वरूपात रोख रक्कम शाळेचे मुख्याध्यापक यांचेकडे सुपूर्त करून साहेबांना विनम्र अभिवादन करण्यात आले.
यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी,भाजपा कार्यकर्ते, ग्रामस्थ शाळेचे मुख्याध्यापक,शिक्षक – शिक्षिका व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.