
कोपरगाव ता. २६ : – भारतीय सीमेवर कार्यरत असताना शहीद झालेल्या जवानांच्या वीर पत्नी व वीर माता यांचा सन्मान कोपरगाव तालुक्यातील राजर्षी छत्रपती शाहु महाराज संघ यांचे वतीने करण्यात आला. छत्रपती शाहू महाराज संघाचे माजी अध्यक्ष श्री मनसाराम पाटील यांचे अध्यक्षतेखाली पार पडला.

याप्रसंगी संघाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब कडू यांनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत केले सदर कार्यक्रमास प्रमुख अतिथी प्राध्यापिका सौ वृंदाताई कोऱ्हाळकर तसेच प्राध्यापक घैसास सर व कोपरगाव तालुका ज्येष्ठ नागरिक संघाचे कार्याध्यक्ष श्री विजयराव बंब यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रथम छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रतिमेचे पूष्पहार अर्पण करून कार्यक्रमास सुरुवात झाली.सुरुवातीस शहीद जवान यांच्या वीर पत्नी व वीर माता यांचा सन्मान करण्यात आला, या नंतर सेवानिवृत्त मेजर यांचा सन्मान करण्यात आला,
कार्यक्रमास राजेश्री शाहू महाराज संघाचे अध्यक्ष श्री बाळासाहेब यशवंत कडू, मुख्य सचिव श्री गोरक्षनाथ शेळके, कार्याध्यक्ष श्री गणपतराव विधाटे, कोषाध्यक्ष श्री व्हि.डी राहतेकर साहेब, उपाध्यक्ष श्री अरुण उदावंत, श्री वहाडणे पाटील तसेच सन्माननीय सदस्य श्री वाघ साहेब,श्री सुकेकर साहेब, श्री सुभाषराव भास्कर साहेब तसेच श्री आरणे साहेब, सौ संगीताताई मालकर व श्रीमती सोनवणेताई उपस्थित होत्या.
त्याचप्रमाणे ज्येष्ठ नागरिक श्रीकांत शेठ बागुल, श्री दीपक राव पाठक, श्री बाळासाहेब कुर्लेकर ,श्री सुभाष जोशी गुरु, श्री उल्हास गवारे, श्री जोरेकर नाना, श्री भंडारी काका, श्री नजन शेठ याप्रमाणे अनेक ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते. महिला प्रतिनिधी म्हणून सौ सुनयनाताई केळकर, सौ रत्ना पाठक ताई सौ तपसे ताई,सौ जोशीताई, सौ कडू ताई,सौ शेळके ताई, सौ अर्चनाताई कडू, सौ श्रुतीताई कडू, श्रीमती गायकवाड ताई,श्रीमती देशमुख ताई,याप्रमाणे अनेक महिला मंडळ हजर होते.
याप्रमाणे कार्यक्रमा ची सांगता होऊन शेवटी संस्थेचे मुख्य सचिव श्री शेळके साहेब यांनी सर्व उपस्थितांचे आभार माणले तर जी पी शेळके यांनी सुत्रसंचलन केले. हा उपक्रम राबविल्याबद्दल कोपरगाव शहरातून व तालुक्यातून राजश्री शाहू महाराज ज्येष्ठ नागरिक संघ पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन व कौतुक होत आहे.