
संपादक - राजेंद्र तासकर
सहकार महर्षी माजी मंत्री कै.शंकरराव कोल्हे यांचे कार्य अतिशय महान होते.आज ते आपल्यात देहाने जरी नसले तरी त्यांचा कार्याचा अथांग समुद्राने ते कायम अपल्या सोबतच राहतील अशा शब्दात महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी कै. शंकररावजी कोल्हे यांना श्रद्धांजली अर्पण केली.
राष्ट्रसंत जगद्गुरू जनार्धन स्वामी मौंनगिरीजी महाराज यांचे उत्तराधिकारी प.पु.१००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरीजी महाराज यांनी नुकतीच कै.कोल्हे यांच्या वस्तीवर सांत्वनपर भेट देत सिंधुताई कोल्हे (माई), संजीवनी शैक्षणिक संस्थेचे विश्वस्त नितीन कोल्हे,सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे,माजी आमदार स्नेहलता कोल्हे, कलावती कोल्हे,अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे संचालक विवेक कोल्हे आदी सह कोल्हे कुटुंबातील सदस्यांची भेट घेत कै. कोल्हे यांच्या आठवणीना उजाळा दिला.
या प्रसंगी जय बाबाजी भक्त परिवार कोपरगाव तालुका अध्यक्ष मुरली मोरे,बाबासाहेब वाघ,निलेश कापसे,राजेंद्र चरमळ,विक्रम मोरे,दत्तू देवकर, राजेंद्र उक्कीर्डे,पवन कापसे,वर्षा वाघ,प्रेरणा कापसे आदी सह जय बाबाजी भक्त परिवारातील सदस्य उपस्थित होते.
या वेळी शांतिगिरी महाराज यांनी पुढे बोलतांना सांगितले की, माजी मंत्री कै.कोल्हे यांनी सहकार,कृषी,शिक्षण या क्षेत्रासोबतच सद्गुरू जनार्धन स्वामी यांच्या कार्याचा प्रसाराचे कार्य देखील फार मोठ्या प्रमाणात करत बाबाजींनी स्थापन केलेल्या विविध शैक्षणिक, सामाजिक क्षेत्राच्या कार्यात देखील कै.कोल्हे यांनी मोलाचे सहकार्य असून त्यांचे हे कार्य फक्त कोपरगाव तालुक्यासाठीच न्हवे तर संपूर्ण राज्याला दिशा देणारे आहे.त्यामुळे कै. शंकररावजी कोल्हे यांनी आपल्या नावाप्रमाणेच महान कार्य करत संपूर्ण आयुष्य जनता जनार्धनाचा उज्वल भविष्यासाठी व्यतीत केले असून मरावे परी कीर्ती रुपी उरावे या म्हणीनुसार कै.शंकररावजी कोल्हे यांना चिरशांती लाभो असे बोलून महामंडलेश्वर शातीगिरीजी महाराज यांनी श्रद्धांजली अर्पण केली.