Homeकोपरगावकोपरगांव पंचायत समितीच्या आवारात माजीमंत्री शंकरराव कोल्हेंचा पुर्णाकृती पुतळा उभारावा- जितेंद्र रणशुर

कोपरगांव पंचायत समितीच्या आवारात माजीमंत्री शंकरराव कोल्हेंचा पुर्णाकृती पुतळा उभारावा- जितेंद्र रणशुर

कोपरगांव तालुका पंचायत समितीच्या आवारात माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचा पुर्णाकृती पुतळा उभारण्यात यावा या मागणीचे निवेदन कोपरगांव तालुका रिपब्लीकन पार्टीचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर यांनी गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांच्याकडे बुधवारी दिले.

संपादक – राजेंद्र तासकर
महाराष्ट्र राज्याचे सहकारमहर्षी व संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक स्व.शंकरराव कोल्हे यांनी कोपरगांव तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून १९६२ ते १९६७ या कार्यकाळात काम केलेले असुन त्यांच्या विचारांचा वारसा आगामी पिढयासाठी मार्गदर्शक ठरावा यासाठी त्यांचा पुर्णाकृती पुतळा कोपरगांव तालुका पंचायत समितीच्या आवारात उभारण्यात यावा अशी मागणी कोपरगांव तालुका रिपब्लीकन पार्टीचे तालुकाध्यक्ष जितेंद्र रणशुर यांनी गटविकास अधिकारी सचिन सुर्यवंशी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
श्री. जितेंद्र रणशुर यांनी आपल्या निवेदनात पुढे म्हटले आहे की,संजीवनी उद्योग समुहाचे संस्थापक,कर्मयोगी, माजीमंत्री शंकरराव कोल्हे यांचे वृध्दापकाळाने नुकतेच निधन झाले.ते उच्च शिक्षीत होते.त्यांनी कोपरगांव तालुका पंचायत समितीचे पहिले सभापती म्हणून तालुक्यात अनेक विकासाची कामे केलेली आहेत. त्याचबरोबरच लोकोपयोगी कामासाठी त्यांनी अनेक लढे देवुन शेतकरी,दीन दलित, अल्पसंख्यांक,आदिवासी, मागासवर्गीय समाजाबरोबरच बहुजनांसाठी प्रचंड सामाजिक काम करून त्यातुन आपल्या कार्याची ओळख निर्माण केली आहे.त्यांचा सामाजिक कार्याचा व्यासंग अफाट असुन त्यांच्या विचारांची प्रेरणा येणा-या युवा पिढीसाठी मार्गदर्शक ठरावी यासाठी त्यांचे पुर्णाकृती शिल्प कोपरगांव तालुका पंचायत समितीच्या आवारात उभारण्यात यावे हिच त्यांच्या कार्याला आदरांजली ठरेल असेही ते म्हणाले.सदरचे निवेदन कोपरगांव तालुका पंचायत समितीचे सहायक प्रशासन अधिकारी देवचंद गायकवाड यांनी स्विकारले.याप्रसंगी शहराध्यक्ष देवराम पगारे,तालुका कार्याध्यक्ष प्रदिप अहिरे,युवा आघाडीचे अध्यक्ष पप्पु दिवेकर, संदिप भाटे,प्रकाश डोखे,सतिष भाटे,संतोष शिंदे,संतोष त्रिभूवन,संतोष मरसाळे,आकाश मरसाळे,लक्ष्मण साबळे,शंकर महंकाळे,राहुल रणशुर, आण्णासाहेब पगारे,शंकर बि-हाडे आदि उपस्थित होते…

     
RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!