
कोपरगाव : – वृद्धपकाळाची काठी असलेल्या तरुण मुलाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्यामुळे आई- वडिलांवर दुःखाचे डोंगर कोसळला होता सुखी समाधानी असलेल्या कुटुंबात अंधाराचा काळोख तयार झाला होता मुलाच्या आठवणीने व्याकुळ झालेल्या माता पिता यांनी जगण्याची आशा सोडली होती वयाच्या ४५ व्या वर्षी आय व्ही एफ तंत्रज्ञानातून पुन्हा आपत्य होऊ शकते याची माहिती मिळाली पती पत्नी यांच्या विविध वैद्यकीय तपासणी नंतर नाशिक येथील इंदिरा आय व्ही एफ च्या संचालिका तज्ञ डॉक्टर डॉ. प्रियंका विशाल कासलीवाल शिर्डी येथे भेट झाली असता मार्गदर्शन व समुपदेशन केल्या नंतर उपचार सुरू केला व नऊ महिन्यांच्या नंतर या शेतकरी कुटुंबातील दाम्पत्याच्या घरात दोन जुळ्या बाळाचा जन्म झाला व या कुटुंबातील लोकांमध्ये जगण्याची एक नवी उमेद निर्माण झाली ते श्रेय या आय व्ही एफ तंत्रज्ञानाला जाते.
डॉक्टर प्रियंका कासलीवाल या श्रीरामपूर येथील साखरेचे व्यापारी स्व खुशालचंद बडजात्या यांची नात असुन स्त्री रोग तज्ञ डॉक्टर. रमेश व डॉक्टर उषा बडजात्या यांच्या कन्या तर दिनेश बडजात्या यांची पुतणी असुन श्रीरामपूरचे नाव त्यांनी वैद्यकीय श्रेत्रात महाराष्ट्रात नावलौकिक वाढवला आहे
डॉक्टर प्रियंका कासलीवाल यांनी या जोडप्यांना आलेली निराश बदलून जगण्याची नवीन उमेद निर्माण करण्यात महत्वपूर्ण भूमिका ठरली आहे वैद्यकीय शास्त्रात तंत्रज्ञान फार मोठे पुढे गेले असून अशक्य गोष्ट देखील शक्य होतात मात्र त्यासाठी मानसिकता महत्त्वाची असते आय व्ही एफ तंत्रज्ञान उपचार पद्धती व मानसिकता समाजामध्ये येणारी जागरूकता यामुळे ह्या दांपत्याने यशस्वीरित्या गर्भधारणा केली आणि आपल्या आयुष्यात दोन निरोगी जुळ्या मुलांना जन्म दिला या जोडप्यां बाबत बोलताना डॉक्टर प्रियांका कासलीवाल म्हणाल्या की, प्रगत असलेले वैद्यकीय तंत्रज्ञान जोडप्यांची सहनशक्ती प्रेम व आधुनिक वैद्यकीय शास्त्राची झालेल्या प्रगतीची जणू काही साक्षी आहे बाळाची जागा कोणीही घेऊ शकत नाही पण घरात नवजात बाळाचे हास्य जीवनात जगण्यासाठी एक उमेद निर्माण करते आय व्ही एफ केवळ विज्ञान नाही तर एक चमत्कार आहे दुदैवाने संकट आलेल्या कुटुंबांना पुन्हा जोडण्याचे सामर्थ्य हे तंत्रज्ञान ठेवते असे सांगताना डॉक्टर प्रियंका कासलीवाल म्हणाल्या की जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीच्या कुणालाही वंधत्वाच्या समस्येला सामना करावा लागत असेल तर किंवा दुर्दैवाने काही अनुचित घटना घडली असेल तर त्या संकटांना सामोरे जात असेल तर खचून न जाता अशा संकटांना वैद्यकीय सामर्थ्याच्या माध्यमातून सामोरे जाता येते वैद्यकीय मदतीमुळे पालकांची स्वप्न देखील साकार होऊ शकते असा विश्वास डॉक्टर प्रियंका कासलीवाल यांनी. व्यक्त केला.