Homeकोपरगावकर्मयोगी समाजसेवी संस्थेचा अनोखा उपक्रम

कर्मयोगी समाजसेवी संस्थेचा अनोखा उपक्रम

कोपरगाव : – कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचना | या उक्ती प्रमाणे संस्था गेल्या पाच वर्षापासून कार्यरत आहे. आर्थिक परिस्थिती बिकट व हालाखीचे असलेले विद्यार्थी कोणत्याही कारणाने शिक्षणापासून वंचित राहू नये असा ध्यास घेऊन ‘ जिथे कमी तिथे आम्ही “.

के बी पी विद्यालयातील 1984/ 85 ची बॅच असलेले हे विद्यार्थी या ध्येयाने पछाडून गेल्या पाच वर्षात कित्येक हजाराचे शैक्षणिक साहित्य, त्यामध्ये वह्या, कंपास बॉक्स, पाठ्यपुस्तके गणवेश रोख रक्कम, इयत्ता दहावीच्या विद्यार्थिनींची फी, महिला महाविद्यालयातील विद्यार्थिनींना गणवेश, खडकी येथील तीन मुलींचे पालकत्व या बॅचने स्वीकारलेले आहे. ” सेवा हाच धर्म सेवा हाच आनंद “. सेवा हाच धर्म मानून कुठेही प्रसिद्धीच्या झोतात न येता निरंतर काम या बॅच चे विद्यार्थी करीत आहेत.

यामध्ये आयुब मन्सुरी, नसरत सय्यद, मेजर बाबू खरात, दिलीप पारखे, गिरीश हिवाळे, बाबासाहेब मालकर व अजूनही बरेचसे विद्यार्थी आहेत.

श्रीमान गोकुळचंदजी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका संगीता मालकर म्हणाल्या की, भावना शून्य व सिमेंट काँक्रीटच्या जंगलात राहणाऱ्या लोकांमध्ये देखील काही लोक असे असतात की जे भावनिक ओलावा जपतात. निश्चितच, अशा सेवाभाव जपणाऱ्या व्यक्तींमुळे चांगली समाज व्यवस्था निर्माण होण्यास मदत होते. निश्चितच ; ज्यामध्ये भावना असतील माणुसकी असेल समाज जागृती असेल या सर्वांचे वेतनमान जेमतेम असूनही कामगिरी मात्र दैदिप्यमान आहे.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!