Homeकोपरगावश्री सद्गुरु गाडगेबाबा महाराज सार्वजनिक वाचनालय तिळवणी यांचे वतीने जिल्हा परिषद प्राथमिक...

श्री सद्गुरु गाडगेबाबा महाराज सार्वजनिक वाचनालय तिळवणी यांचे वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिळवणी शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

कोपरगाव : – “हर घर तिरंगा घर घर तिरंगा ” या कार्यक्रमांतर्गत श्री सद्गुरु गाडगेबाबा महाराज सार्वजनिक वाचनालय तिळवणी यांचे वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तिळवणी शाळेच्या विद्यार्थ्यांमध्ये वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या त्यातील प्रत्येक वर्गातील प्रत्येकी तीन याप्रमाणे गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. प्रत्येक विद्यार्थ्यांना याप्रसंगी वही ,पेन ,कंपास पेटी, पेन्सिल, खोडरबर , चित्रकला वही यासारखे शैक्षणिक साहित्य सर्व विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

याप्रसंगी तिळवणी गावचे सरपंच गोविंद पगारे, वाचनालयाचे अध्यक्ष मा. विष्णू रंगनाथ वाघ, अनिल शेळके, संपतराव शिंदे, शेलार, अमोल शिंदे हे उपस्थित होते

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी श्री गोविंद बाबा पगारे हे होते. त्यांनी आपल्या भाषणातून शैक्षणिक साहित्याचे महत्त्व सांगितले. शिक्षण थांबू नये यासाठी सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक व्यक्तीने आपल्या उत्पन्नातील काही भाग समाजाच्या उन्नती करता वापरावा. शिक्षण घेणारा कधीच निराश होत नाही अशा प्रकारचे विचार सरपंच पगारे यांनी मांडले.

मुख्याध्यापक मा. श्री. लक्ष्मण पंडोरे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक करून शैक्षणिक साहित्य वाटप कार्यक्रम हा विद्यार्थ्यांमध्ये शाळेची व शिक्षणाची गोडी वाढावी यासाठी असतो असे विचार व्यक्त केले.

मा.श्री विष्णू वाघ आपले मनोगत व्यक्त करतांना म्हणाले कि, दरवर्षी इयत्ता पहिली ते सातवीच्या वर्गातील प्रत्येक गरीब विद्यार्थ्यांचे शिक्षण व पालकत्व मी स्वीकारण्याचे कबूल केले आहे आणि जाहीर ही केले आहे .

याप्रसंगी गाडगेबाबा सार्वजनिक वाचनालयाच्यावतीने दिला जाणारा 2025 – 26 चा गुणवंत शिक्षक पुरस्कार मा.श्री. बंडू राठोड सर यांना देण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विवेक तळपे सर यांनी केले तर शेवटी आभार प्रदर्शन श्री अशोक राहाणे यांनी केले.

या कार्यक्रमासाठी श्री रावसाहेब लहरे स्त्रेया अनिल शेळके यांनी विशेष परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांना बक्षीस मिळाल्यामुळे सर्व विद्यार्थी आनंदी होते अशा प्रकारचे प्रसंग विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची गोडी वाढवतात तसेच शिक्षणास उत्तेजन देतात या प्रकारचे विचार मुख्याध्यापक मा.श्री. पंडोरे सर यांनी व्यक्त केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!