
कोपरगाव : – “रयत शिक्षण संस्थेचे श्री सद्गुरू गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथे शिक्षक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. ०५ सप्टेंबर या दिवशी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती संपूर्ण देशामध्ये मोठ्या उत्साहाने ‘ शिक्षक दिन’ म्हणून साजरा करण्यात येते. हे औचित्य साधून महाविद्यालयातील विद्यार्थीनी वसतीगृहाच्या वतीने शिक्षक दिन साजरा करण्यात आला. यावेळी डॉ.सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.माधव सरोदे यांच्या शुभहस्ते व प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत झाले. याप्रसंगी मा. प्राचार्य, शिक्षक, शिक्षकेत्तर सेवक यांचा गुलाब पुष्प देऊन वसतिगृहाच्या विद्यार्थिनींनी सन्मान केला.
शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थिनींना शुभ संदेश देताना प्राचार्य डॉ. माधव सरोदे म्हणाले की, “देशाचे माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचे शिक्षणातील तात्विक योगदान महत्त्वपूर्ण असून त्यांचा आदर्श घेऊन शिक्षकांनी समाजाला उन्नती कडे नेण्याचे कार्य करावे. तसेच मानवी जीवनामधील शिक्षकांचे महत्व अधोरेखित करून शिक्षक हा ज्ञान देणारा नव्हे तर विद्यार्थ्यांच्या आयुष्याचा मार्गदर्शक व प्रेरणास्थान आहे” असे प्रतिपादित केले. सदर प्रसंगी वसतिगृहाच्या कु.आश्विनी शिंदे व कु. भूमिका येवले या विद्यार्थिनी आपली मनोगते व्यक्त केली.
यावेळी प्रा.गहिनीनाथ जाधव कार्यालयीन सेवक श्री.सतीश जाधव, श्री. दिलीप दुशिंग व महाविद्यालयीन सेवक, वसतीगृहातील विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक विज्ञान विभागाचे उपप्राचार्य डॉ. घनश्याम भगत यांनी केले तर आभार डॉ. भागवत देवकाते यांनी मानले.