
सभासदांनी विश्वास दाखवील्यानेच 15 वर्षापासून आदर्श सभासद आणि आदर्श संस्था उभी करू शकलो – चेअरमन मुकुंद सिनगर.
कोपरगाव : – नुकतीच भोजडे नं 2 सेवा सोसायटीची 27 वी वार्षिक सभा आणि 15 वा आदर्श सभासद पुरस्कार वितरण सोहळा अत्यंत साध्या पण अनोख्या पद्धतीने पार पडला. पुरस्काराचे वितरण नेवासा येथील रामकृष्णाश्रमाचे प्रमुख परम पूज्यनीय ह.भ.प.निलेश महाराज रोढे आणि कोपरगाव येथील ओम शांती ध्यान केंद्र‘च्या प्रमुख ब्रम्हकुमारी सरला दीदीजी यांच्या शुभहस्ते तसेच शिवसेनेचे बाळासाहेब जी पवार, सचिन जी मालिक आणि ज्ञानेश्वर जी कपिले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन मुकुंद शहाराम सिनगर होते.


सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि संस्थेचे संस्थापक कै.सीताराम व्यंकटराव पा.सिनगर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर संस्थेचे सचिव गणेश बारहाते यांनी सभेचे कामकाज सुरु करत सर्वं विषय एकमताने मंजूर करण्यात आले. कोपरगाव तालुक्यातील पूर्व भागातील शेतकऱ्यांची कामधेनू म्हणून भोजडे सेवा सोसायटी आदर्शवत असून आपल्या सभासदांच्या सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असते. गेल्या 15 वर्षापासून संस्था आपल्या एकूण सभासदांपैकी निकषाद्वारे निवड करून आदर्श सभासद पुरस्कार देते. ज्यात सन्मानचिन्ह आणि रोख 1111/- रुपये मात्र दिले जातात. हा उपक्रम अत्यंत प्रेरणादायी असून यामुळे सोसायटी वसूल वाढण्यात मोठी मदत झालेली आहे. यावर्षी आदर्श सभासद 2026 पुरस्कार संस्थेच्या सभासद सौ. मुक्ताबाई रामभाऊ साबळे यांना देण्यात आला. संस्था नेहमीच सामाजिक कार्यावर भर देते आणि सभासदांच्या अडचणीत मदत करते त्यामुळे संस्थापक कै.सीताराम पा.सिनगर यांच्या अपेक्षेप्रमाणे आणि सभासदांच्या विश्वासाच्या बळावर आदर्श संस्था उभी करू शकलो असल्याचे प्रामाणिक मत संस्थेचे चेअरमन मुकुंद सिनगर यांनी व्यक्त केले.

भोजडे गावाने प्रामाणिक सहकार जपला – ह.भ.प.निलेश महाराज रोढे ; यावेळी अनेकांनी संस्थेच्या कामकाजाचे कौतुक करत छोट्या गावातही सहकार सक्षमपणे पुढे जात असल्याने अभिमान व्यक्त केला. त्यामुळे भोजडे गावाने प्रामाणिक सहकार जपल्याची भावना ह भ प निलेश महाराज रोढे यांनी व्यक्त केली.

सहकारातील सेवा ही ईश्वरसेवा – ब्रम्हकुमारी सरला दीदीजी ; आदरणीय सरला दीदींनी अध्यात्मिक मार्गदर्शन करत सहकारतील सेवा ही ईश्वर सेवा असून याचं वाटेवर चालत रहा, संस्था नेहमीच प्रगती करेल यांची खात्री व्यक्त केली.
यावेळी भोजडे सोसायटी 1 चे चेअरमन रंगनाथ नाना सीनगर, लोकनियुक्त सरपंच सुधाकर वादे, तंटामुक्ती अध्यक्ष संभाजी तात्या सीनगर, प्रगतीशील शेतकरी अनंत तात्या सीनगर, उपसरपंच दिलीप सीनगर, धोत्रा येथील विष्णू पाडेकर, रवंदा येथील तान्हाजी मामा लामखडे, घोयेगाव येथील पत्रकार अमीन शेख, साईभक्त सागर करडे, संतोष सीनगर,विजय सीनगर, शहाराम सीनगर, सुधाकर सीनगर, गोरख अण्णा गलांडे, यांच्यासह पंचक्रोशीतील सभासद आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेचे व्हा.चेअरमन दिनकर बाबासाहेब सिनगर, संचालक सर्वं श्री ज्ञानेश्वर बबरू सिनगर, अशोक रामजी मंचरे, रामनाथ चांगदेव चंदणे, दीपक धोंडीराम धट, रावसाहेब देवराम सिनगर, फकीरचंद राजाराम जेऊघाले, राजेंद्र गोपीनाथ घनघाव यासंह सर्वं संचालक मंडळानी मेहनत घेतली.
सभेचे सूत्रसंचालन सागर करडे, प्रास्ताविक गणेश बारहाते तर शेवटी मुकुंद सिनगर यांनी सर्वांचे आभार मानले.