Homeकोपरगाव१२ ज्योतिर्लिंग पदयात्रेसाठी निघालेले मोनू (ब्लॅक पँथर) यांचे संवत्सर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार...

१२ ज्योतिर्लिंग पदयात्रेसाठी निघालेले मोनू (ब्लॅक पँथर) यांचे संवत्सर ग्रामस्थांच्या वतीने सत्कार व शुभेच्छा

कोपरगाव :- देशभरातील धार्मिक स्थळांना व त्याठिकाणी असणाऱ्या देवी देवतांच्या चरणी नतमस्तक होऊन तेथील पावित्र्य जपणे व त्या ठिकाणी असलेली उर्जा आत्मसात करून आंतरबाह्य मन शुद्ध करणे यांस पदयात्रा म्हणतात. पैकी १२ ज्योतिर्लिंग पदयात्रेसाठी निघालेले मोनू (ब्लॅक पँथर) यांचे आज संवत्सर गावात आगमन झाले. यावेळी गावातील ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करून पदयात्रेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी गावातील प्रमुख नागरिक, युवक व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. संपूर्ण गावात उत्साहाचे आणि भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. ‘हर हर महादेव’ आणि ‘जय श्रीराम’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला.

यावेळी संजीवनी कारखान्याचे माजी व्हा. चेअरमन श्री. आप्पासाहेब दवंगे, संजीवनी सहकारी पतसंस्था कोपरगावचे चेअरमन मा. राजेंद्रभाऊ परजणे, संजीवनी कारखान्याचे माजी संचालक मा. बाळासाहेब शेटे, भाजपा दिव्यांग सेल कोपरगाव तालुकाध्यक्ष मुकुंदमामा काळे, संवत्सर ग्रामपंचायत सदस्य महेशभाऊ परजणे, भाजपा पूर्व मंडल कोपरगाव सदस्य सचिन शेटे, अनुप शिंदे, अनिल शेटे, चिमा दैने, राजेंद्रआबा बोरनारे, योगेश परजणे, बाळासाहेब रानोडे, नंदु परजणे, दिलीपराव कासार, दिनेशराव बोरनारे, संदीप मैंद, अनिल भाकरे, योगेश नेहे यांसह आदि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हर हर महादेव!जय श्रीराम!!

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!