
कोपरगाव : – सर्व सृष्टीचे विघ्नहर्ता तसेच सर्वांना सुख शांती प्रदान करणारे कोपरगांवचे ग्रामदैवत श्री गोकर्ण गणेश देवस्थान, गणपती चावडी, कापड बाजार मंदिरात संकष्टी गणेश चतुर्थी निमित्ताने बुधवार दिनांक १० सप्टेंबर २०२५ रोजी समता चॅरिटेबल ट्रस्टचे सर्वेसर्वा मा. श्री. ओमप्रकाश तथा काकासाहेब कोयटे व त्यांच्या धर्मपत्नी माजी. नगराध्यक्षा सौ. सुहासिनीताई कोयटे तसेच कोपरगावचे ब्राम्हण सभा अध्यक्ष मा. श्री. मकरंद कोऱ्हाळकर सर व त्यांच्या धर्मपत्नी सौ. सुनिता कोऱ्हाळकर यांच्या शुभ हस्ते पुरोहितांच्या मंत्रोच्चारासह विधीवत पूजा व आरती करण्यात आली.
यावेळी आरतीनंतर मंदिराच्यावतीने मा. श्री. काकासाहेब कोयटे यांचा मा. श्री. मकरंद कोऱ्हाळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच इन्स्टाग्राम कंटेंट क्रीएटर दिव्यांका परदेशी यांचा देखील मा. श्री. काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
देवस्थानचे विश्वस्त श्री. सुरेश महाजन व श्री. सुभाष महाजन यांनी धार्मिक परंपरा टिकविल्याबद्दल मा. श्री. काकासाहेब कोयटे यांनी समाधान व्यक्त केले. तसेच कोपरगांवचे ग्रामदैवत गोकर्ण गणेश मंदिराचे अनन्य साधारण महत्व असल्याचेहि त्यांनी गौरोद्गार यावेळी काढले.
या प्रसंगी ब्राह्मण सभेचे उपाध्यक्ष बी. डी. कुलकर्णी, सौ. शामल कुलकर्णी, अजिंक्य पदे, विजय जोशी, संदीप जोशी, प्रकाश खंडागळे, जवाहर गुजराती, राजेंद्र डागा, जंगम काका आदि उपस्थित होते. पौरोहीत्य श्री. प्रदीप पदे गुरु यांनी केले.
तद्नंतर उपस्थित भाविकांना साबुदाणा खिचडीचे वाटप करण्यात आले. शेवटी उपस्थितांचे आभार प्रकाश खंडागळे यांनी मानले.