
मुख्य संपादक – राजेंद्र तासकर
कोपरगांव :- तालुक्यातील टाकळी- धामोरी रस्त्यावरील काळधोंडी नाल्यातील खड्डे रस्ते वाहतुकीसाठी अत्यंत धोकेदायक झाले असून ते तातडीने बुजवावे अशी मागणी असंख्य वाहनधारकांनी केली. गाडे वस्ती ते मुखेड फाटा रस्ता अत्यंत खराब आहे पावसाळ्यात तर साधे पायी चालणे सुद्धा मुस्कील झाले होते. त्याची तात्काळ दुरुस्ती व्हावी.
सध्या कारखान्यांचे गळीत हंगाम सुरु आहे. गांव शिवारातील उसाची वाहतुक याच रस्त्याने मोठ्या प्रमाणांत होते. या रस्त्यावर खाजगी बाजार समिती आहे येथे शेतमालविक्रीसाठी परिसरातील शेतकरी आपापल्या वाहनाने शेतमाल आणतात, त्यांनाही या दिव्य खड्ड्यातूनच प्रवास करावा लागतो. या रस्त्यावरील काही खडडे बुजवले पण त्याचे काम थातुरमातुर पध्दतीने करण्यांत आले. या खड्ड्यामुळे असंख्य दुचाकी चारचाकी वाहनधारकांचे कंबरडे मोडले आहे. टाकळी धामोरी रस्ता अहिल्यानगर व नाशिक या दोन जिल्हा हद्दीस जोडणारा महत्त्वाचा रस्ता आहे. रात्री-अपरात्री या खड्डयात पडुन अनेक निरपराध वाहन धारकांच्या जीवीताला धोका तयार होऊन त्यात ते जायबंदी झाले, काहींना कायमस्वरूपी अपंगत्व आले तर काही देवाघरी गेले. तेंव्हा सार्वजनिक बांधकाम खात्याने निष्पाप नागरिकांचेबळी जाणार नाही यासाठी वेळेत तातडीने या खड्ड्यांची दुरुस्ती करून वाहनधारकांना दिलासा धावा अन्यथा यावरून प्रवास करणारे प्रवासी केव्हाही या रस्त्यावरील वाहतूक बंद करून आंदोलन करतील. कोपरगाव -कोळपेवाडी भागात या रस्त्याने वाहनांची वर्दळ मीठी असते तेंव्हा हा खडड्यांचा धोकादायक प्रवास थांबवावा.