Homeकोपरगावउमरावती सोसायटी बँक पातळीवर शंभर टक्के वसुली

उमरावती सोसायटी बँक पातळीवर शंभर टक्के वसुली

कोपरगांव- तालुक्यातील देर्डे कोऱ्हाळे येथील उमरावती सहकारी सोयायटीच्या सर्व कर्जदार सभासद शेतक-यांनी ३० जुन पुर्वीच बँक पातळीवर शंभर टक्के वसुली देवुन सोसायटीला सहकार्य केले अशी माहिती संस्थापक व सहकारमहर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अरूणराव येवले यांनी दिली.

ते म्हणाले की, सहकारी सोसायटया हया ग्रामिण भागातील शेतक-यांच्या शेती समृध्दीसाठी सातत्यांने कार्यरत आहेत. माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी सहकारी सोसायटयांच्या प्रत्येक प्रश्नांत लक्ष घालुन त्यांना मोलाचे मार्गदर्शन केले होते.
संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली नवनिर्वाचित आमदार व जिल्हा बँकेचे संचालक विवेक कोल्हे हे आता सोसायटी पातळीवर उदभवणा-या समस्यांना स्वतः लक्ष घालुन काम करत आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शासनस्तरावर शेतक-यांना कर्जमाफी देवुन दिलासा देण्यांचे काम केले आहे. दुष्काळ, नापिकी, कमी पर्जन्यमान यामुळे शेती पिकाची परिस्थिती कठीण आहे तरीही उमरावती सहकारी सोसायटी कर्जदार सभासद शेतक-यांनी वेळेवर कर्जफेड करून तालुक्यात बँक पातळीवर ३० जुन पुर्वीच वसुली देणारी सोसायटी म्हणून नांवलौकीक मिळविला आहे.

चालुवर्षी पावसाळा सुरू होवुनही एलनिनो संकटामुळे पर्जन्यमान होत नाही त्यामुळे शेतकरी सभासदासमोर चिंता निर्माण झाली आहे त्याचबरोबर कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी विधीमंडळात ५ जुलै नंतर शेतकरी कर्जमाफीची रक्कम दिली जाईल असे सुतोवाच केले आहे, महायुती शासनांने शेतक-यांना दिलासा द्यावा व खरीप पिकासाठी वेळेवर आर्थीक तरतुद करावी असे ते म्हणांले. सोसायटीचे अध्यक्ष देवराम गवळी, उपाध्यक्ष साहेबराव शिंदे व सर्व संचालक यांनी मनांपासुन कर्ज वसुलीत सहकार्य केले त्यांचे कौतुक करावे तेव्हढे थोडे आहे शेवटी सचिव अशोक घेर यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!