
कोपरगाव :- प्रहारच्यावतीने दिनांक 29 व 30 मार्च रोजी प्रहार करिअर अकॅडमी,पुणे-संभाजीनगर रोड लगत, इमामपूर,अहिल्यानगर येथे प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली व प्रहार कार्याध्यक्ष बल्लूभाऊ जवंजाळ, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष धर्मेंद्र सातव यांच्या उपस्थितीत पदाधिकारी/ कार्यकर्त्यांची व राज्यातील प्रहार संघटनेची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे..
या कार्यशाळेमध्ये दोन दिवस स्वतः बच्चु भाऊ आपणास मार्गदर्शन व प्रशिक्षण देणार आहेत. आंदोलनाविषयी यावेळी सविस्तर चर्चा करून निर्णय घेण्यात येणार आहेत..
राज्यस्तरीय प्रशिक्षण व कार्यशाळेसाठी आपण कार्यकर्ते पदाधिकारी सह स्वतः उपस्थित राहावे असे आवाहन प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष विनोद सिंग परदेशी प्रहार दिव्यांग संघटनेचे राज्य उपाध्यक्ष लक्ष्मणराव पोकळे , जिल्हाध्यक्ष मधुकर घाडगे, जिल्हा महिला अध्यक्षा लक्ष्मीताई देशमुख, जिल्हा सचिव हमीद भाई शेख, जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख, जिल्हा संपर्कप्रमुख पांडुरंग कासार, जिल्हा समन्वयक आप्पासाहेब ढोकणे, जिल्हा प्रसिद्धीप्रमुख पोपटराव शेळके यांच्यावतीने करण्यात आले.
आपल्या तालुक्यातून किमान 100 दिव्यांग बांधवना घेऊन कार्यक्रमास उपस्थित राहावे दोन दिवसाच्या कार्यशाळे दरम्यान प्रहार करियर अकॅडमी व जूनियरकॉलेजचे उद्घाटन बच्चुभाऊंच्या शुभहस्ते होणार.
कार्यक्रमाच्या ठिकाणी सर्वांची दोन दिवस राहण्याची व जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. प्रत्येक तालुक्यातून एका ॲक्टिव्ह प्रहार कार्यकर्त्याचा सन्मान बच्चुभाऊंच्या हस्ते केला जाणार, निष्क्रिय पदाधिकारी यांच्या जागेवर नवीन दिव्यांगाला संधी दिली जाणार असल्याचेही आपल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.