Homeनाशिकसाहित्यिकांनी मराठीतील शब्दकोशासाठी नवीन शब्द द्यावेत - जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

साहित्यिकांनी मराठीतील शब्दकोशासाठी नवीन शब्द द्यावेत – जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

नाशिक प्रतिनिधी : – साहित्यिकांनी मराठी भाषेसाठी नवीन शब्दांची निर्मिती करून शब्दकोशासाठी द्यावेत असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले. पुढे म्हणाले नाशिक शहराला मोठा वारसा असून नुकतीच विश्व मराठी संमेलन इथे संपन्न झाले. मराठीला अभिजीत भाषेचा दर्जा मिळालेला असून ज्ञानपीठ पारितोषिक विजेते कुसुमाग्रज आणि दादासाहेब फाळके अशा दिग्गजांच्या नाशिक भूमीमध्ये साहित्यिकांचा सन्मान करताना आम्हाला अतिशय आनंद होतो आहे. महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार नाशिक जिल्हा मराठी भाषा समितीच्यावतीने आयोजित मराठी भाषा व साहित्य यांचा प्रचार-प्रसार व संवर्धन यासाठी कार्यरत राहून बहुमूल्य योगदान देणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील मराठी भाषा संवर्धक, अभ्यासक, संशोधक, लेखक आणि साहित्यिक यांच्या सत्कार समारंभाच्या निमित्ताने झालेल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते.यावेळी नाशिक मध्यच्या आमदार प्रा. देवयानी फरांदे यांनी जिल्हाधिकारी यांच्या भाषणाचा धागा पकडून नाशिक भूमी मधील स्वातंत्र्यपूर्वक सावरकर यांच्यासारख्या महान साहित्यिकानी मराठी भाषेसाठी अनेक शब्द दिलेले आहेत याचा पुनरुच्चार केला आणि ही नाशिक साठी अभिमानाची गोष्ट आहे असे प्रतिपादन केले. साहित्यिकांच्या,लेखकांच्या, संशोधकांच्या सन्मानासाठी मला उपस्थित राहता आले याबद्दल त्यांनी आयोजकांचे आभार मानले. यावेळी दत्ता पाटील,ऐश्वर्य पाटेकर, संजय वाघ,सतीश बोरा, विनायक रानडे, माधुरी माटे,अनंत येवलेकर,सचिन चंद्रात्रे, मनोहर विभांडिक, संजय चौधरी, विवेक उगलमुगले, सौ.जयश्री वाघ, काशिनाथ महाजन, विजयकुमार मिठे,सौ.संयुक्ता कुलकर्णी, विलास पंचभाई आणि उल्हास रत्नपारखी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी नाशिक महानगरपालिकेच्या शिक्षणाधिकारी डॉक्टर मिता चौधरी, जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती प्रतिभा संगमनेरे, जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकारी श्रीमती सर्व जगताप या उपस्थित होत्या.

समानार्थीच्यावतीने विवेक उगलमुगले यांनी मनोगत व्यक्त केले. नाशिक जिल्हा मराठी भाषा समितीचे सचिव तहसीलदार प्रदीप वर्पे अशासकीय सदस्य सुभाष सबनीस, संतोष हुदलीकर, सौ. योगिनी जोशी यांनी कार्यक्रमाचे संयोजन केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार प्रदीप वर्पे यांनी केले तर सर्व पाहुण्यांचा परिचय सुभाष सबनीस यांनी करून दिला सूत्रसंचालन सौ. सोनाली मंडलिक यांनी केले.

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments

error: Content is protected !!