
संपादक -राजेंद्र तासकरकेंद्र शासनाच्या जलजीवन मिशन अंतर्गत धारणगावसह चार गावांच्या पाणी पुरवठा योजनेसाठी २९ कोटी ६२ लाखाचा निधी मंजुर-मच्छिंद्र केकाण संपादक -राजेंद्र तासकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामिण भागातील तहानलेल्या नागरिकांपर्यंत पिण्याचे पाणी देण्यासाठी जलजीवन मिशन योजना कार्यान्वीत केली असून राज्याचे माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे,संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असुन त्या अंतर्गत कोपरगांव विधानसभा मतदार संघातील धारणगाव,मुर्शतपुर, जेउरपाटोदा,हिंगणी आणि चांदगव्हाण या संयुक्त पाणी पुरवठा योजनेसाठी २९ कोटी ६२ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून हया पाणी योजनांची कामे मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन माजी सभापती मच्छिंद्र केकाण यांनी दिली. ते म्हणाले की,तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे तत्कालीन आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली धारणगाव,मुर्शतपुर, जेऊरपाटोदा,हिंगणी व चांदगव्हाण या पाच गावच्या प्रतिष्ठीत नागरीक,सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सर्व अधिकारी यांचे शिष्टमंडळ घेवून ही प्रादेशिक पाणी योजना मार्गी लागावी म्हणून मंत्रालय स्तरावर तसेच अधिवेशन काळात पाठपुरावा केला.माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे येथील राष्ट्रीय राज्य व जिल्हा तालुका मार्गाच्या रस्ते कामाबरोबरच हया पाणी योजनासाठी निधी मिळावा म्हणून शिर्डी येथे मागणी केली होती.धारणगाव सह चार गावच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कामासंदर्भातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी स्व.शंकरराव कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी स्थानिक तसेच अहमदनगर नाशिक येथील जीवन प्राधिकरण अधिका-यांबरोबर वारंवार बैठका घेतल्या.केंद्राच्या जल जीवन मिशन अंतर्गत या पाणी योजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६० टक्के तर राज्य शासन स्तरावर ३० टक्के आणि संबंधीत गांवचा १० टक्के अशा विगतवारीनुसार २९ कोटी ६२ रूपयांचा निधी मंजूर झाला त्यासाठीचा सर्व पाठपुरावा हा भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांचाच आहे असेही ते शेवटी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ग्रामिण भागातील तहानलेल्या नागरिकांपर्यंत पिण्याचे पाणी देण्यासाठी जलजीवन मिशन योजना कार्यान्वीत केली असून राज्याचे माजीमंत्री स्व.शंकरराव कोल्हे,संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष बिपीनदादा कोल्हे आणि भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला यश आले असुन त्या अंतर्गत कोपरगांव विधानसभा मतदार संघातील धारणगाव,मुर्शतपुर, जेउरपाटोदा,हिंगणी आणि चांदगव्हाण या संयुक्त पाणी पुरवठा योजनेसाठी २९ कोटी ६२ लाख रूपयांचा निधी मंजूर झाला असून हया पाणी योजनांची कामे मार्गी लागणार असल्याचे प्रतिपादन माजी सभापती मच्छिंद्र केकाण यांनी दिली.
ते म्हणाले की,तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे तत्कालीन ग्रामविकास मंत्री पंकजा मुंढे तत्कालीन आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्या नेतृत्वाखाली धारणगाव,मुर्शतपुर, जेऊरपाटोदा,हिंगणी व चांदगव्हाण या पाच गावच्या प्रतिष्ठीत नागरीक,सरपंच, उपसरपंच,ग्रामपंचायत सदस्य व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे सर्व अधिकारी यांचे शिष्टमंडळ घेवून ही प्रादेशिक पाणी योजना मार्गी लागावी म्हणून मंत्रालय स्तरावर तसेच अधिवेशन काळात पाठपुरावा केला.माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे येथील राष्ट्रीय राज्य व जिल्हा तालुका मार्गाच्या रस्ते कामाबरोबरच हया पाणी योजनासाठी निधी मिळावा म्हणून शिर्डी येथे मागणी केली होती.धारणगाव सह चार गावच्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कामासंदर्भातील त्रुटी दुरुस्त करण्यासाठी स्व.शंकरराव कोल्हे व भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांनी स्थानिक तसेच अहमदनगर नाशिक येथील जीवन प्राधिकरण अधिका-यांबरोबर वारंवार बैठका घेतल्या.केंद्राच्या जल जीवन मिशन अंतर्गत या पाणी योजनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ६० टक्के तर राज्य शासन स्तरावर ३० टक्के आणि संबंधीत गांवचा १० टक्के अशा विगतवारीनुसार २९ कोटी ६२ रूपयांचा निधी मंजूर झाला त्यासाठीचा सर्व पाठपुरावा हा भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलताताई कोल्हे यांचाच आहे असेही ते शेवटी म्हणाले.